प्रतिनीधी – कोरोना प्रादुर्भाव काळात कोरोना अहवाल बाबतची विश्वासाहर्ता डळमळीत होत चालली असतानाच मीरा रोड येथील कोरोना चाचणी प्रयोगशाळा “अपूर्वा डायग्नोसिस आणि हेल्थकेअर” यांच्या कोरोना अहवालातून चुकीच्या बाबी उघड झाल्या आहेत.

सदर विरार येथील संशयित कोविड महिलेचा स्वँब घरून कलेक्ट केला असताना लँब ने “वालवा देवी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” हे नाव छापले त्याबद्दल संबंधीत रुग्णालयाशी संपर्क साधून माहिती घेतली असता रुग्णालयाने या गोष्टीचा इन्कार करत त्यांनी लँब मधून आलेला माफीनामाचा मेल सादर केला. तसेच लँबने कोविड संशयित महिला रुग्णाला तिचा अहवाल निगेटिव्ह (मेल द्वारे) सांगून काहीच तासांतच अहवाल (मेल द्वारे) पॉजिटीव असल्याचे सांगितले. लँबचा हा अनागोंदी कारभार रुग्णाच्या जीवावर तसेच आताच्या परिस्थितीत विश्वासाहर्तेला इजा पोहचवू शकतो. या घटनेनंतर वसई विरार मध्ये खळबळ उडाली आहे.

आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांनी शंका उपस्थित करून वविमनपा क्षेत्रातील रुग्णालयांमधील या लँबचे कोरोना अहवाल ग्राह्य धरावे का? असा सवाल उपस्थित करून अशी किती प्रकरणे घडली असतील याची चौकशी करावी. या कृत्यामागे कुठला भ्रष्टाचार तर डोके वर करत नाही ना याची शहानिशा करावी. तोपर्यंत सदर लँबला वविमनपा क्षेत्रात कोरोना तपासणीसाठी मज्जाव करावा अशी मागणी केली आहे.

◆ सदर अहवाल प्रकरणी आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. पुन्हा अशी चुक होणार नाही. -ए बालकृष्णन (अपूर्वा डायग्नोसिस आणि हेल्थकेअर)

आम्ही आमच्या रुग्णालयाचे नाव वापरत असल्याबद्दल अनभिज्ञ होतो, आम्ही चौकशी केली असता आमची सदर लँब ने माफी मागितली – डॉ अमृत पवार (वालवादेवी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल)

चाचणी अहवालात गफलत होत असताना रुग्णांनी कुणावर विश्वास ठेवायचा? अशा प्रयोगशाळांची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात यावी – राजेंद्र ढगे (आमची वसई रुग्णमित्र)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *