◆ बहुजन विकास आघाडी म्हणजे सत्ता पिपासू पक्ष: उत्तम कुमार

◆ भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन

वसई : श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उसगाव येथे उभारलेल्या कोविड सेंटरचे काल राज्याचे एकमेव यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी देवेंद्र फडणवीस यांना वसई तालुक्यात कोरोना संदर्भात चाललेल्या अनागोंदी कारभाराचे निवेदन देऊन यात त्यांना लक्ष घालण्याची विनंती केली.
उत्तम कुमार यांनी निवेदनाच्या माध्यमातून वसई-विरारमधील खासगी हॉस्पिटलमध्ये घेतल्या जाणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांची बाब लक्षात आणून दिली. नालासोपारा येथे असलेल्या विनायक हॉस्पिटलमध्ये झालेल्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्याची विनंती केली.
तसेच वसई तालुक्यात प्रत्येक खासगी लॅबमध्ये सिटीस्कॅन साठी वेगवेगळ्या किमती घेऊन चाललेल्या लूट ची माहिती दिली. लसीकरणातही बविआ आपल्या पक्षाचे पिवळ्या रंगाचे कापड संपूर्ण लसीकरण केंद्राला लावून निवडणुकीला समोर ठेऊन काही मोजक्या आपल्या लोकांना लसीकरण करून दिले जात आहे व या सगळ्या गोष्टीला वसई-विरार महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे. वयोवृद्ध नागरिकांच्या पार्श्वभूमीवर नवी लसीकरण केंद्र वसई तालुक्यात उघडणे गरजेचे आहे. अशी माहिती निवेदनाच्या माध्यमातून दिली.
उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, ज्याप्रमाणे पंढरपूर मध्ये आपण महाभकास आघाडीचा पराभाव केलात तसाच आता वसई-विरार च्या जनतेसाठी आपण बविआ आणि शिवसेनेच्या जाचातून वसई तालुक्याला मुक्त करून ‘यांचा कार्यक्रम करा’ अशी विनंती राज्याचे विरोधी पक्ष नेते सन्मा. देवेंद्रजी यांना विनंती केली. असे यावेळी ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *