

(बातमीदार आकेश मोहितें) कोरोना विषाणूचा वाढता संक्रमण पूर्ण जगामध्ये हाहाकार माजवत आहे. चीनने जन्माला घातलेल्या कोरोना विषाणूने आत्तापर्यंत चीनमध्ये ३५०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. १ विषानुवर आळा घालण्यासाठी चीन बरोबरच इतर देश अतोनात प्रयत्न करत असताना चीन मधून आणखी एक विषाणू वातावरणात पसरण्याची बातमी सध्या जगासमोर पसरली आहे. हंता विषाणू असे या विषाणूचे नाव असून चीन मधील युन्नात प्रांतामध्ये एका व्यक्तीचा या विषाणूमुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल्स टाइम्सने ही बातमी उघडकीस आणल्याचे कळते. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशनचे म्हणणे आहे की हा रोग फक्त उंदीर आणि खारच्या संपर्कात आल्यास जखडला जातो, याची लागण कोरोना एवढी नसली तरी या रोगाची लागण झाल्याने मृत्यूची श्यक्यता ३८% नी वाढते,
अंग दुःखी, ताप, डोकेदुखी अशी या रोगाची लक्षणे असून अनेकांच्या मते जर चीनने संपूर्ण जनावरांना खाणे बंद केले नाही तर संकटग्रस्तांची आकडेवारी वाढण्यात मदत होऊन कोरोनासारखे हंता विषाणूचेही थैमान जगात पसरण्यास वेळ लागणार नाही.