

सांगली, (तेहसीन चिंचोलकर) – देशात कोरोना चे संकट टळले नही या भयंकर महामारी ने आजपर्यन्त कोट्यवधीं जणांना आपले जिव गमवावे लागले असून, आजही तेवढेच रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत. पण अजूनही देशात सर्वत्र कोरोनाचे भय संम्पलेले नही. अशा संकटाना पावलो पावल मात देऊन प्रत्येकाच्या जीवाला वाचवताना कोरोना योद्धांचा सम्मान करताना शब्द भेटेना. मग ते पोलीस वर्ग, सामाजिक कार्यक्रमाद्वारे नेहमी मदतीला पुढे येणारे विविध संस्थेचे कार्यकर्ता वर्ग किंवा डॉक्टर वर्ग आदि. आम्हाला अभिमान वाटते की देवाचे दुसरे रूप म्हणजे डॉक्टर नर्स व या क्षेत्रातील सर्व सेवार्थी. ते आड व वेळ न बघता मदतीसाठी नेहमीच तत्पर. अशाच आमच्यातील देव माणूस म्हणजे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील डॉक्टर जमीर सय्यद व त्यांचे सहकारी वर्ग. या सेवाअभावी युवाशक्ती एक्सप्रेस परिवार तर्फे नुकतेच अभिमानाने त्यांचे सम्मान केले.
डॉक्टर जमीर सय्यद हे गेले 12-15 वर्षापासून ही डॉक्टरी सेवा आपल्याला सहकाऱ्यांबरोबर तेथील नागरिकांना देत आहेत. सांगली येथे शामराव नगर मध्ये त्यांचे छोटेसे दवाखाने असून ते तेथून कोरोना काळात वेळोवेळी गरजू गरिबांना सेवा देत आहेत. त्यांनी ही सेवा गरजवंत नागरिकांना मोफत ही दिली आहे. तपासणी करून आजारी माणसाला व्यवस्थित मार्दर्शन व मोफत औषधं ही दिली. यादरम्यान मध्ये डॉक्टर सय्यद यांना नागरिकांना सेवा देताना कोरोनाची लागण झाली. व त्यांच्या सेवेत खंड पडला. त्यांची रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याने त्यांनी स्वतः संपूर्ण कोरांटीन जबाबदारी घेतली, व आपल्याला कुटुंबियांना सुरक्षित ठेवले. ही जबाबदारी घेत असताना त्यांनी मात्र आपली सेवा फोन द्वारे लोकांना संपर्क करून औषधांचा सल्ला देत असे. आपली तबयेत बरी झाल्यावर डॉक्टर सय्यद पुन्हा आपल्याला कामावर रुजू होऊन नागरिकांना बघण्यासाठी सज्ज झाले. ते बघून त्यांचे सहकारी पण त्यांच्याबरोबर वावरताना मागे नाही राहिले.
शेवटी म्हणावे की डॉक्टर सय्यद व त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा आणीबाणीच्या परिस्थितीला रुगणांची सेवा करण्याचे जे व्रत चालविले आहे त्यांच्या या सेवेसाठी सलाम!