
वसई (प्रतिनिधी): स्वातंत्र्यपूर्व काळापासून पिढ्यानपिढ्या वसई, नायगाव,खोचिवडे कोळीवाड्यातील कोळी माय भगिनी वसईच्या किनाऱ्यावरून स्थानिक घाऊक मच्छीमार व्यापारी कडून मासळी घेऊन मुंबईतील विविध मासळी मार्केटमध्ये जाऊन छोट्या मोठ्या ताज्या मासळीचा व्यवसाय करीत आहेत. मात्र अचानक मुंबई महाराष्ट्र सह देशावर कोरोना महामारीचे ओढवलेले संकट त्याचे दुष्परिणाम सरकारने घातलेले लॉक डाउन,संचारबंदी,जमावबंदी, सोशल डिस्टनसिंग या सारख्या निर्बंध या मुळे कोळ्यांचे मुंबईत,मुंबई परिसरातील व जवळच्या कोळीवड्यातील मच्छीमार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या परिस्थितीत कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता मुंबईतील सर्व बाजारपेठा व्यवसाय बँड आहेत किंवा नियम अटी घालून सुरू आहेत मात्र मुंबईतील मासळी मार्केट कोरोना संसर्गाची भीती व सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईतील मासळी मार्केट संदर्भात संभ्रम आहे. मार्केट सुरू झाली तरीही संसर्गाचा धोका नाकारू शकत नाही.त्यासह तुडुंब भरलेल्या गर्दीत ये जा करणेही कोळी महिलांच्या जिवावर बेतणारे आहे. वसई नायगावच्या मासळीला देश विदेशात मागणी असताना मुंबई ठाणे शहरात ज्या धर्तीवर किरकोळ मासळी मार्केट आहेत तशी वसई नायगाव मध्ये मार्केट सुविधा नसल्याने मुला बाळांना घरातल्या वडीलधारीकडे सोपवून रात रात जागून वसई नायगाव कोळीवाड्यातून मासळी घ्यायची ती मासळी मुंबई ठाणे शहरातील खवय्यापर्यंत पोहचे पर्यंत ताजी तवानी ठेवण्यासाठी काळजी घेत पहाटे घराचा उंबरा ओलांडून गच्च भरलेल्या वाहन किंवा रेल्वेतून शहरातील मार्केट गाठायची हा साठ सत्तर वर्षांपासून सुरू असलेला आटापिटा जीवावर बेतण्यासारखा आहे, मुंबई ठाणे शहरात अपुऱ्या जागेत वसलेल्या मार्केट मध्ये गर्दी गोंधळात सोशल डीस्टनचे पालन होणं हे शक्य नाही या गोंधळात कोरोना संसर्ग वाढीसाठी चालना मिळेल याची खबरदारी म्हणून वसई नायगाव मधील मासळीला स्थानिक पातळीवर बाजरपेठ तयार व्हावी मच्छिमार समाजातील बेरोजगार तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, वसई नायगाव मधील माय भगिनींची प्रवासात व मुंबई मासळी मार्केट मध्ये होणारी हेळसांड मुख्यत: कोरोना संसर्ग टाळता यावा अशा विविध प्रकारच्या अडचणींना आळा घालण्यासाठी वसई तालुक्यातील नायगाव रेल्वे स्टेशन पश्चिम लागत उड्डाणपुलाच्या खाली मोकळ्या जागेत किंवा नायगाव रेल्वे स्टेशन वरून उभारण्यात येत असलेल्या पुला खाली किरकोळ मासळी बाजारासाठी जागा उपलब्ध करून सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा संपन्न मासळी मार्केट उभे करून देण्याचे मागणीचे निवेदन जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विजय वैती यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए),नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस , देशाचे रेल्वेमंत्री पियुष गोयल राज्याचे मत्स्यमंत्री असलम शेख याना ईमेल द्वारे देण्यात आले.