

कोविड सेंटर मधील असुविधेप्रकरणी मनसेचा पालिकेत राडा ?
वसई (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वालीव येथील कोवीड सेंटरमध्ये रुग्णांचा जीवघेणा छळ होत असल्यामुळे मनसे झाली. मनसेने याप्रकरणी काल मुख्यालयात ऱाडा करून आयुक्तांना शिव्यांची लाखोली वाहित पालिकेच्या कारभारा निषेध केला.वसई विरारमध्ये कोरोनाने थैमान घातलेला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण असून मनपा प्रशासन आपले सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नुकतेच प्रभाग समिती ‘जी’हद्दीतील वरूण इंडस्ट्रीयल इस्टेट, गोलानी नाका, वालीव, वसई पुर्वे येथे मनपाने १००० बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये अवघ्या ०५ दिवसात सौम्य लक्षणे असलेले व लक्षणे दिसत नसलेले ६१० पॉझीटीव्ह रूग्ण दाखल करण्यात आलेले आहेत. परंतु कोविड सेंटरमधील रूग्णांच्या गैरसोयीचे विविध व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेले असून रूग्ण तथा नागरीकांमार्फत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या कोविड सेंटरमध्ये उपचाराच्या नावाखाली रुग्णांचा जीवघेणा छळ केला जात असल्याचे उघड झाले आहे. रुग्णांना प्यायला गरम पाण्याऐवजी टँकरचे दूषित पाणी दिले जाते, दुपारचे बारा वाजले तरी सकाळचा नाष्टा मिळत नाही, गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त शौचालयामुळे महिला रुग्णांना ओका-या येत आहेत.येथील एकाही रुग्णांची तपासणी केली जात नसून उपचाराच्या नावाखाली त्यांना फक्त गोळ्या दिल्या जात नसल्याचे समोर आले आहे
या सेंटरमध्ये डॉक्टराचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. ड्युटीवर असलेले कर्मचारी रुग्णांची उर्मटपणे वागतात. उपचारा ऐवजी कोरोनटाईन केलेले नागरिक आजारी पडू लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या या सेंटरमधील शेकडो नागरिकांनी आपापली घरे गाठली आहेत.हा प्रकार कळल्यावर मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले.दरम्यान
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव याप्रकरणी आपल्या कार्यकर्त्यांसह आयुक्त गंगाथरन डी यांना भेटण्यासाठी मुख्यालयात गेले होते. मात्र फक्त दोनच कार्यकर्त्याला आपल्या दालनात पाठवण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यामुळे जाधव संतप्त झाले.
त्यांनी कोट सेंटरमधील हेळसांड कारभाराचे फोटो आयुक्तांच्या दरवाजावर चिकटवले. त्यानंतर आयुक्तांना उद्देशून शिवीगाळ करत निषेध केला. कोवीड सेंटरमध्ये सुधारणा झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी जाधव यांनी केली. जाधव यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुख्यालयातील वातावरण काही काळ तंग झाले होते.