दि.१०/६/२०२२ रोजी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोळी महासंघ पालघरच्या आणि आsत्मोन्नती विश्वशांती आनंद संप्रदाय वारकरी मंडळ,समाज उन्नती संघटना,युवा समाज प्रबोधन मंडळ यांच्या मार्फत पुण्यतिथी कार्यक्रम व वारकरी मेळावा तुळयाचापाडा मोऱ्हाडा ता.मोखाडा जि.पालघर येथे आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी अनुसूचित जाती जमातीचे १०१ जातीचे दाखले मोफत वाटप, वारकरी संप्रदायासाठी ३ मृदंग व ३ गायन पेटी ( हार्मोनियम ) वाटप,२ जनसेवा केंद्राचे उद्घाटन,२ सेट संगणक वाटप करण्यात आले.

यावेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष मा.आमदार.श्री.रमेश दादा पाटील,श्री.विश्वनाथ पाटील कुणबी सेना प्रमुख,गोपाळ महाराज ,श्री.रामदास लहारे महाराज, माजी सभापती श्री.जयराम निसाळ,जिल्हा प्रमुख श्री.तन्मय साखरे,श्री.रामदास लहारे जिल्हा संघटक,श्री.सुशील ओगले कोकण विकास आघाडी अध्यक्ष,श्री.ज्योती ताई सारसे तालुका अध्यक्ष ,श्री.हेमंती ताई भुसारे , मुरलीधर कडू ,श्री.कोमल ताई जोशी कोळी महासंघ महिला संघटक ,श्री.पुष्पा ताई पाटील,श्री.गीतांजली वाघ,श्री.भावेश मनीवडे,श्री.किशोर वैती,श्री.राजेंद्र मोरे तसेच मोठ्या संख्येने अदिवासी समाज बांधव,वारकरी बांधव,कोळी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *