खातेदारांना बँकेकडे मागावी लागते भीख …..

नवी मुंबई (पराग पाटील) : सप्टेंबर 2019 पनवेल मध्ये बहुचर्चित असलेला कर्नाळा बँक 574 कोटी रुपयांची खातेदारांची फसवणूक! दिवसें दिवस येतात बँकेचे घोटाळे समोर अशा परिस्थितीत सरकार काही महत्त्वपूर्ण पावले उचलतील का ?
असा प्रश्न उपस्थित केला आहे अर्नाळा बँकेतील एक खातेदार श्री जगदिष चंद्रा पटनायक यांचे सुपुत्र चंदन पटनायक यांनी.
श्री जगदिष चंद्रा पटनायक हे या बँकेचे फाउंडर मेंबर तसेच बँक सुरू झाल्यापासून चे खातेदार आहेत. यांचे आठ लाखाच्या वरील रक्कम अर्नाळा बँकेतील पनवेल येथील शाखेमध्ये जमा होती सध्याच्या परिस्थितीत जगदीश पटनायक व त्यांच्या कुटुंबाला भरपूर वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. औषधोपचारासाठी देखील पैसे नसल्याकारणाने जगावे की मरावे अशा दुहेरी मनस्थिती ला सामोरे जात आहेत.
बँकेत जाऊन याबाबत विचारणा केली असता त्यांचे चे मॅनेजर व कर्मचारी उडवाउडवीची उत्तर देऊन हाकलून लावतात. तसेच आपले पैसे आपल्याला लवकरात लवकर परत मिळतील असे सांगतात. संचालक मंडळातील श्री विवेकानंद पाटील चे पनवेलचे पूर्व आमदार देखील होते पैसे मिळण्याबाबत चौकशी केली असता म्हणणे असे की सध्या बँकेची अवस्था बिकट आहे व लवकरात लवकर तुमचे पैसे मिळतील.
सदर प्रकरणात चंदन पटनायक यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री उद्धवजी ठाकरे तसेच आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना देखील या बाबत पत्र लिहिले आहे तसेच संबंधित अधिकारी आरबीआय व इतर शासकीय यंत्रणेला देखील याबाबतचे लेखी तक्रार नोंदवण्यासाठी पत्र लिहिण्यात आले आहे.
Covid-19 परिस्थितीमध्ये कामधंदे ठप्प, पैशाची उलाढाल होत नाही, सामान्य नागरिकांना जिथे जगण्यासाठी धडपड करावी लागते. पैसे ठेवण्याचा एक मात्र सुरक्षित ठिकाण म्हणून समजले जाते ती बँक . अशा परिस्थितीत जर बँकांमध्ये असलेले खातेदारांचे पैसे, बँक देण्यास नकार देत असेल अशा परिस्थितीत खातेदारांनी काय करावे ? आयुष्यभरा ची मेहनत करून सामान्य नागरिक पैसे जमा करतात या आशेने की संकटकाळी किंवा अत्यावश्यक वेळी हे पैसे कामात येतील.
महाराष्ट्रातील लोक डाऊन तसेच अनलॉक ची प्रक्रिया सुरू असतानादेखील कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना अन्नपुरवठा व तसेच जीवनावश्यक वस्तू दिल्या जात आहे. परंतु जे व्यक्ती आजाराने ग्रस्त आहेत अशा नागरिकांच्या औषध पाण्याचा खर्च हा त्यांना स्वतः करावा लागत आहे. उपजीविकेसाठी काम धंदा नाही, पैसा आहे परंतु तो ही बँकेत, आपल्याला आपलाच पैसा बँक परत देत नाही. अशा परिस्थितीत नागरिक हवालदिल झालेले आहेत. तरी अर्नाळा बँकेशी संबंधित शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन नागरिकांचे पैसे परत मिळवून द्यावे यासाठी शासनाला योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे व या सर्वांचे गांभीर्य लक्षात घेता बँकाच खातेदारांचे पैसे त्यांना देण्यास नाकारत असेल तर हे अशी अत्यंत गंभीर बाब ही खातेदारांच्या जीवावर बेतू शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *