

खारघर (राजेश चौकेकर): खारघर
गावातील सर्व पाड्यांमध्ये ग्रामपंचायत कालावधीत स्ट्रीट लाईट ची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. आता मात्र सदर खारघर विभाग पनवेल महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यापासून सदर ठिकाणी सद्य स्थितीत बंद अवस्थेत असलेल्या स्ट्रीट लाईट पनवेल महापालिका मार्फत सुरू करण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. कागदोपत्री मात्र सदर स्ट्रीट लाईटच्या संदर्भात मेंटेनन्स दिला जातो, मात्र प्रत्यक्षात स्ट्रीट लाईट सुरू करणेबाबत काम झालेले नाही. यावर लवकरात लवकर चौकशी करून बंद स्थितीमधले स्ट्रीट लाईट चालू होऊन नागरिकांची गैरसोय दूर व्हावी अश्या मागणीचे निवेदन या वेळी शिवसेना शहर प्रमुख तथा खारघर सरपंच मा. गुरुनाथ लिलाधर पाटील यांनी महापालिका विभागीय अधिकाऱ्यांना दिले.