

श्री राजेंद्र ढगे (आमची वसई रुग्णमित्र)
प्रतिनीधी – गेली वर्षभर जग हे कोरोनारुपी संकटाच्या खाईत लोटले गेले आहे, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. टाळेबंदीच्या काळात लोकांच्या मिळकतीवर परिणाम झाला असून अनेक जण बेरोजगार झाले असून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढती महागाई लक्षात घेता सामान्यांचे कंबरडे मोडले असून नागरीक हतबल झाले आहे.
कोरोनारुपी संकटाच्या खाईतून बाहेर पडण्यासाठी भारतात लस उपलब्ध झाली आहे व ही लस सरकारी रुग्णालय मधे मोफत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंगीकृत खासगी रुग्णालयात ₹ 250/- दराने उपलब्ध करून दिली आहे. कोरोनावर मात करावयाची असेल तर त्रिसूत्री नियमांचा वापर करत तसेच लस मोफत उपलब्ध करत विजय मिळविला पाहिजे असा मत जनसामान्यांचा आहे. आमची वसई चे रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांनी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे व आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे जी यांच्याकडे खासगी रुग्णालयात होणारी लसीकरण मोहीम हि मोफत व्हावी यासाठी मागणी वजा सुचना केली आहे.
सरकारी रुग्णालयात लसीकरण मोफत असले तरी अपुरी मनुष्यबळ पाहता तिथे नागरिकांची गर्दी होत असल्याचे आढळून येत आहे, मोफत लसीकरणास प्राधान्य देत खासगी रुग्णालयात देखील लसीकरण मोफत ऊपलब्ध झाले तर या लसीकरण मोहीमेला वेग येईल. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत लसीकरण करवून राज्यातील नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी रुग्णमित्रांतर्फे केली जात आहे.