
वसई विरार मधील जनतेला वीज बिलाबाबत लवकरच दिलासा दायक बातमी मिळेल

खासदार म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे – खा.राजेंद्र गावित
वसई : आज पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी महावितरण वसई मंडळाला भेट दिली. वसई वीज वितरण मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री.मंदार अत्रे आणि विभागीय अभियंता उपस्थित होते. यावेळी खासदार गावित यांनी वसई विरार मधील वीज बिल वाढ, सरासरी वीज बिल आकारणी आणि विविध विषयांवर चर्चा केली. सोबत शिवसेनेचे विनायक निकम आणि नगरसेविका किरण चेंदवणकर उपस्थित होते. लवकरच याबाबत बैठक घेऊन यावर निर्णय घेण्यात येईल असे खासदार राजेंद्र गावित विश्वासात्मक आश्वासन दिले.