
केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (DISHA) समितीची बैठक आज दिनांक २६ नोव्हेंम्बर रोजी राजेंद्र गावित खासदार तथा अध्यक्ष दिशा समिती यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषद सभागृह येथे पार पडली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढण जिल्हाधिकारी पालघर डॉ.माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पालघर नगराध्यक्ष पालघर नगरपरिषद डॉ.उज्वला काळे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तुषार माळी इ.उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागा मार्फत या समिती चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खासदार गावित यांनी केंद्र पुरस्कृत योजनांचा उपस्थित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.
रोजगार हमी योजने अंतर्गत जास्तीत जास्त मोगरा लागवड करावी ,तसेच पाण्याचे दुर्भिक्ष असताना देखील जव्हार मोखाडा सारख्या भागात स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केली आणि पालघरची स्ट्रॉबेरी ओळख झाली त्यामुळे कुपोषणावर मात करायची असेल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, असे मत या वेळी खासदार गावित यांनी व्यक्त केले.
श्रावण बाळ योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांना लाभ दिला आणि किती अर्ज बाकी आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेतली.तसेच राष्ट्रीय खाद्य सुरक्षा, प्रधानमंत्री उज्वला योजना प्रधानमंत्री आवास योजना शहरी,विद्युत वितरण महामंडळ, आणि ग्रामीण स्वच्छ भारत मिशन शहरी,आणि ग्रामीण, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा १ आणि टप्पा २, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, कुपोषण, शिक्षण प्राथमिक आणि माध्यमिक इ विभागांचा या समिती मध्ये सविस्तर आढावा घेण्यात आला.सदर समितीस संबंधित अधिकारी आणि दिशा समिती चे सदस्य उपस्थित होते.