गतविजेता मोहित राठोर नव्या विक्रमासह बनला १० व्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन २०२२ चा विजेता

                                                  


       रविवार दिनांक ११ डिसेंबर, २०२२ रोजी  १० वी वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धा नवीन विवा कॉलेज, विरार पश्चिम येथे संपन्न झाली. या स्पर्धेत उत्तर प्रदेशाच्या मोहित राठोरने पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉन मध्ये नव्या विक्रमासह विजेतेपद पटकाविले.
मोहित राठोर याने शर्यत पूर्ण करणेसाठी वेगवान सुरुवात करून प्रतिस्पर्धीना शर्यतीत मागे टाकले. आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या अर्जुन प्रधानने मोहित राठोरला कडवी झुंज दिली. दोघेही धावपटू ३७ किलोमीटर पर्यंत बरोबरीने धावत होते. परंतु त्यानंतर मोहितने आपला वेग वाढवून अर्जुन प्रधानला स्पर्धेत मागे टाकून विजेतेपद पटकाविले. मोहित राठोर २:१८:०८ या सर्वोत्तम वेळेत शर्यत पूर्ण करून यापूर्वी २०१८ मध्ये रशपाल सिंग यांनी केलेला २:२२.०४ चा विक्रम मोडला.
      महिलांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत दिल्लीच्या उजालाने १:१३:३६ या वेळेत शर्यत पूर्ण करून यापूर्वीचा २०१७ मध्ये असलेला १:१७:०१ वेळेचा विक्रम मोडून विजेतेपद पटकाविले.  
    उजालाने स्पर्धा जिंकताना पटना मॅरेथॉन ची विजेती प्राजक्ता गोडबोले हिच्यावर मात करत विजेतेपद पटकाविले. दुसऱ्या क्रमांकावरील प्राजक्ताला शर्यत पूर्ण करणेसाठी १:१५:१२ इतका वेळ लागला, तसेच तिसऱ्या क्रमांकावरील फुलन पाल हिने १:१६:०२ वेळेत शर्यत पूर्ण केली.
      पुरुषांची अर्ध मॅरेथॉन स्पर्धा १:०५:२९ वेळेत पूर्ण करीत किरण म्हात्रे यांनी अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले
      पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमधील एलिट विजेत्याला ३ लाख रुपये व अर्ध मॅरेथॉन विजेत्याला २ लाख रुपये बक्षीस स्वरुपात मिळाले. 

स्पर्धा विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे :
पूर्ण मॅरेथॉन (एलिट पुरुष) : १) मोहित राठोर ०२:१८:०८ २) अर्जुन प्रधान ०२:२०:१३,
३) अनिश थापा ०२:२०:५१
पूर्ण मॅरेथॉन (खुला गट पुरुष) : १) महेश वाधवानी ०२:३१:५४, २) अरुण राठोड ०२:३२:५७,
३) विपुल कुमार ०२:३५:०६
पूर्ण मॅरेथॉन (खुला गट महिला) : १) अश्विनी जाधव ३:००:५४, २)स्वाती पंचबुद्धे ३:१३:१५,
३) प्रीती चौधरी ०३:१९:१७
अर्ध मॅरेथॉन (एलिट पुरुष) : १)किरण म्हात्रे ०१:०५:२९, २) श्रवण बेनिवाल ०१:०५:३१,
३)प्रवीण खंबल ०१:०५:५३
अर्ध मॅरेथॉन (एलिट महिला) : १)उजाला ०१:१३:३६, २) प्राजक्ता गोडबोले ०१:१५:१२,
३) फुलन पाल ०१:१६:०२

                                                                         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *