
मुंबई/प्रतिनिधी:- रे ऑफ होप या संस्थेतर्फे गतिबंध मुलांना त्यांच्या नेतृत्व गुणांना वाव देण्यासाठी डान्स दिल या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. अंधेरी पूर्व विशेष मुलांची शाळा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शाळेचे मुख्याध्यापक यांनी मार्गदर्शन केले. रे ऑफ होप या संस्थेचे त्यांनी कौतुक केले. हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न झाला. रे ऑफ होप या संस्थेचे संस्थापक, एडवर्ड परेरा म्हणाले की अशा विविध प्रकार स्पर्धा गाण्याचे स्पर्धा आम्ही मुंबईमध्ये भरवणार आहोत. अशा विशेष मुलांना आम्ही आमच्या संस्थेच्या रे ऑफ होप संस्थेच्या माध्यमातून डान्स दिल से हा कार्यक्रम आयोजित केला होता.