वसई – प्रतिनिधी – समाजामध्ये वावरताना गरजवंताला मदत केली की मनस्वी आनंद प्राप्त होतो असे विधान काल वसई पापडी येथील राम मनोहर लोहिया नगर येथील नव्याने उभारलेल्या गोल अकादमी ( क्लासेस) मध्ये परिसरातील विद्यार्थ्याना खाऊ आणि मास्क वाटप करताना चिंगारी फाउंडेशन चे सदस्य मिनल वनमाळी यांनी काढले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास आम्ही चौघीच्या महिला प्रमुख गीता गायकवाड दैनिक आपला उपनगराच्या संपादिका अनिता घायवट गोल अकादमीच्या प्रिंसिपल संध्या गायकवाड, चिंगारी फाउंडेशन चे मिनल वनमाळी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अरुण घायवट गोल अकादमीच्या ट्रस्टी विधी घायवट उपस्थित होते. यावेळी परिसरातील ५० मुलांना खाऊ आणि मास्क चे वाटप करण्यात आले. या वेळी सोशल डिस्टंसिंग चा वापर करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच श्रीमती. वनमाळी यांनी चिंगारी फाउंडेशनच्या सर्वेसर्वा पिंकी राजग्रिया मिस आशिया २०१७ व समाज सेविका या दानशूर असून गरजवंताला मदत करताना त्यांना मनस्वी आनंद मिळत असल्याचे कथन केले तर सामाजिक कार्यकर्ते डॉ. अरुण घायवट यांनी समाजामध्ये गरजवंताला मदत करणाऱ्या व्यक्ती आहेत म्हणून समाज सावरलेला असतो अशा लोकांची गरज समाजाला मोलाची असते हे सांगितले. गोल अकादमीच्या प्रिन्सिपल संध्या गायकवाड यांनी मुलांना खाऊ आणि मास्क वाटप केल्या बद्दल आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *