आधुनिकतेच्या युगात माणसांमध्ये मोठ्या प्रमाणात विषमता पाहावयास मिळते आहे. कोण कोणाचा सगा आणि कोण कोणाचा सगे सोयरी, हे आताच्या काळात पाहावयास मिळत नाही आहे. सखे भाऊ – बहीनीचे नाते असणारे आता वैरी होताना दिसत आहेत. त्यामुळे समाजातील प्रत्येक वेक्ती कोणत्या ना कोणत्या नैराश्या मध्ये गुंडाळून lजाताना दिसते आहे. प्रत्येकाचं काही ना काही दुःख असते. पण सांगणार कुणाला, ज्याला सांगावेसे वाटे. त्यानेच दगा केला तर, आणि सर्वच तसे नसतात. विश्वास घात करणारे पण काही असे असतात कि बोलतात एक आणि करतात एक. त्यामुळे या जगात विश्वास कुणावर ठेवावा? हे भोळ्या मनाला काही पटत नाही…..!
प्रत्येकाला एक भरोसेमदं व्यक्ती हवा असतो. पण वागत कुणीच नाही तस….
कुणी विश्वास दाखवणारा भेटला तर आपण म्हणतो कि तो माणूस भरोसेमंद आहे. त्याला तुम्ही सर्व काही सांगू शकता. पण तसा कोणी आता राहिला आहे का.? प्रत्येकाच्या मनात स्वार्थीपणा लपलेला आहे. मला तु हे दिलं तर मी ते देईन. पण माणुसकीचा झरा ओवाळून टाकणारे कोणच आता दिसत नाही.
पूर्वीच्या काळी ती माया प्रत्येकात असायची, खायला जरी नसलं तरी सुखे बीके खाऊन पाहुणचार केला जायचा. पण आता ते पाहावयास भेटत नाही.
शहरात तर उलटंच गणित पाहावयास मिळते आहे. तु कोण, मी कोण, आल्या माझ्या मागल्या…! अशी अवस्था झाली आहे. कुणाच्या घरी जरी जायचं झालं तर विचारूनच या. किंवा येणार असाल तर किती दिवस राहणार असे अनेक प्रश्न….?
अश्या सर्व गोष्टी मुळे माणूस एकटा पडत चालला आहे. आपले दुःख सांगावे तरी कोणाला. ऐकणाराच जर कोणी नसेल. तर तो मानसिक रित्या पूर्ण पणे खचून जातोय. आणि शेवटी आत्महत्या सारख्या गोष्टी त्यांच्या मनात आल्या वाचून राहत नाही..
तेव्हा मला प्रत्येक वेळी असा प्रश्न पडतोय कि या युगात माणुसकी शिल्लक राहिली आहे कि नाही. खरा माणूस कुठे भेटेल.? हे सर्व पाहत असताना नेहमी कवि “मंगेश पाडगावकरांची ” कविता आठवते….. ति अशी……..!

माणूस शोधतो मी…
कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी

हे धर्म, देवळे ही धुंडून सर्व आलो
भिंतीपल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी

हव्यास हा सुखाचा, कल्लोळ वासनांचा
जळत्या चितेवरी या माणूस शोधतो मी

फासून रंग रात्री दिवसा भकास सारे
खिडकीत विक्रयाच्या माणूस शोधतो मी

काळ्या उभ्या तिजोऱ्या गाणे खरीदणाऱ्या
येथे जित्या गळ्याचा माणूस शोधतो मी

त्वेषात बाहुल्यांचे जाती जथे पुढे हे
कळसूत्र तोडुनी हे माणूस शोधतो मी

या झोपड्यांत आली वाहून ही गटारे
चिखलात हुंदक्यांच्या माणूस शोधतो मी

या संस्कॄतीस साऱ्या ही चूड लाविली मी
वणव्यात पेटलेल्या माणूस शोधतो मी

  • मंगेश पाडगांवकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *