

शशिकांत ठसाळ (ठाणे) : गवळी सेवा फाऊंडेशन रजि. महाराष्ट्र राज्य या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना संकट काळात आपल्याला खऱ्या अर्थाने जे सरंक्षण देण्याचं काम केलं ते आपले पोलीस बांधव, डॉक्टर्स, गॅसवाले, अंगणसेविका, नर्सेस, या सर्वांचे मनोबल वाढवणे ही आज खऱ्या अर्थाने गरज आहे तेच काम आमच्या संस्थेच्या वतीने करण्याचे ठरविले आहे. ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. म्हणून या संस्थेने संपूर्ण राज्यात अशा कोरोना योद्धयांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.या संस्थेचे पदाधिकारी आपले काम संपूर्ण महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे करत आहेत. समाज बांधवांना कोणत्या अडी-अडचणी असतील तर त्या सोडविणे, मदत करणे, सामाजिक कार्य करणे, झाडे लावा झाडे जगवा या सारखे उपकरण राबवणे, वैद्यकीय मदत मिळवून देणे, शैक्षणिक मदत मिळवून देणे. अशी एक ना अनेक कामे या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहेत.
संस्थेचे संस्थापक श्री दिनेश भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्याचे स्वयंसेवक पदाधिकारी श्री परशुराम नारायण ठसाळ यांच्या नेतृत्वाखाली व ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री शशिकांत शिवराम ठसाळ यांच्या उपस्थितीत दाभोळ गावातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुनील नारायण पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री दीपक रामचंद्र कदम, सहाय्यक पोलीस फौजदार श्री महेश टेमकर, पोलीस नाईक श्री राजू मोहिते, पोलीस कॉ. श्री राजेंद्र नलवडे, व इतर पोलीस बांधव, महिला पोलीस यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच डॉक्टर श्री रुपेश दळवी, गॅस एजन्सी सौ अर्चना खांडके, पत्रकार श्री स्वप्नील घटे या सर्वांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आले आहे. सर्वांनी संस्थेचे आभार व्यक्त केले.
गवळी सेवा फाऊंडेशन रजि. महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका दापोली, दाभोळ गावातील पोलीस बांधव, डॉक्टर्स गॅसवाले, पेट्रोल पंप, अंगणसेविका, पत्रकार यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान.