

मुंबई : या विभागतील संपूर्ण टीम आणि सर्व कर्तव्य दक्ष देणगीदार समाजबांधव यांच्या वतीने तसेच सर्वांनी सहकार्य करून आजचे नियोजित तीन ठिकाणी कार्यक्रम घेऊन मोफत पाणी व मोफत अल्पोपहार वाटप करण्यात आले हे वाटप मुंबईतील केईम हॉस्पिटल परेल व सायन हॉस्पिटल सायन तसेच राजावाडी हॉस्पिटल घाटकोपर येथे कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर गैरसोय पाहता हॉस्पिटलमध्ये रूग्णाच्या नातेवाई यांना तसेच गोरगरिब गरजूंना मोफत अन्नदान करून गवळी सेवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने एक समाजा समोर नवा आदर्श निमार्ण केलं आहे.
ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर यांनी सर्व मुंबई विभाग टीम व सर्व पदाधिकारी यांचे विशेष कौतुक आणि मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे.
असेच सामाजिक कार्य आपल्या हातून असेच घडो अशा शुभेच्छा सर्व पदाधिकारी याना दिल्या आहेत.
आमची ओळख सामाजिक सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन समाजाला एक नवीन दिशा दाखवून दिली ह्या मध्ये मुंबई विभागाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी पंदेरे, महिलाध्यक्ष सौ विशाखाताई खेडेकर, उपाध्यक्ष उदयजी चिले, मुंबई संघटक किशोरजी ठसाळ, अभयजी घोले, राहुलजी घोले, ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आणि गवळी सेवा फाऊंडेशन चे संस्थांपक माननीय दिनेशजी भोजने व संस्थापिका सौ दिक्षाताई भोजने, कोकण संघटक विश्वनाथजी पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष शशिकांतजी ठसाळ, ठाणे कोपरी संपर्क प्रमुख राकेशजी ठसाळ, मयूरजी महाडिक, प्रसादजी विठोबा गार्डी, मिलींदजी कांबळे, अरूणजी घोले, संतोषजी कोटकर, अमोलजी भुरण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला असून एक नवीन दिशा समाज्याला दाखवून देण्याचे काम गवळी सेवा फाऊंडेशनच्या वतीने समाजासमोर ठेवले आहे.
संस्थेच्या ह्या सामाजिक कार्याची दखल सर्व सामजिक व राजकिय स्तरातून घेतली असून विशेष आभार मानले जात आहेत.