
पालघर :वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात प्रभाग फ वॉर्ड क्रमांक 45 मध्ये मोडणाऱ्या गावराईपाडा गावातील रहिवाशांसाठी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी गावातील तरुण व मर्चंट नेव्ही ऑफिसर
गणेश बाळकृष्ण पाटील यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
दुसऱ्या लाटेत कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे.आजच्या घडीला जवळ जवळ 8 ते 9 जणांना कोविड मुळे आपले प्राण गमवावे लागले आहे तर शेकडो जण आजही कोविडने बाधित आहेत.कोविड वर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण हेच सध्यातरी या आजारावर एकमेव पर्याय आहे.लसीकरणासाठी येथील रहिवाशांना मोठे अंतर गाठावे लागते हे नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गावातच लसीकरण केन्द्र सुरु केल्यास ग्रामस्थांच्या दृष्टीने सुरक्षित राहील असे मत
गणेश बाळकृष्ण पाटील यांनी व्यक्त केले आहे.याठिकाणी लसीकरण केन्द्र सुरु केल्यास गावातील तरुण वर्ग देखील पालिकेला या शिबिरात सहकार्य करण्यास तयार आहेत.
आपणांस सदर शिबिराचे आयोजन करण्यासाठी येथील विविध स्वंयसेवी संस्था तसेच गावातील स्वंयसेवक आवश्यक ती मदत करण्यास तयार आहेत.याबाबतीत आपण जातीने लक्ष घालून सदर परिसरात लवकरात लवकर लसीकरण केंद्र सुरु करून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करावे अशी विनंती गणेश पाटील यांनी केली आहेे
लसीकरणाबाबत उदासीनता
गावराईपाडा गाव याठिकाणाहून पालिकेवर स्वतंत्र असा लोकप्रतिनिधी निवडून येतो.मात्र येथील रहिवाशांसाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतला नाही.मतदानावेळी नेहमी पुढे पुढे करणारे लोकप्रतिनिधी ,राजकीय पक्ष येथील रहिवाशांच्या लसीकरणाबाबत एवढे उदासीन का ?असा संतप्त सवालही गावराईपाडा गावातील सुपुत्र गणेश बाळकृष्ण पाटील यांनी उपस्थित केला असून सध्या महामारी कडे लक्ष देऊन वाटचाल करत आहे व वेळ आली की ह्या माजखोर व ढोंगी प्रतिनिधींना जाब नक्कीच विचारून त्याचा हिशोब करणार अशी कणखर भावना गणेश बाळकृष्ण पाटील ह्यांनी प्रगत केली.