गाव मौजे बोळींज येथील सर्वे क्रमांक 397 अ व 411 अ या दोन्ही जमिनीच्या सातबारा सदरी ग्रामपंचायत बोळींज अशी नोंद आहे. मात्र मौजे बोळींज येथील अतिक्रमण नोंदवहीमध्ये उपरोक्त सर्वे क्रमांकाच्या समोर 1961-62 साली यशवंत जयराम भोईर यांचे नाव लागलेले दिसते. अतिक्रमण नोंदवहीचे संपूर्ण पान बदलण्याचा पराक्रम श्री महेश यशवंत भोईर या इसमाने केलेला आहे. सरकारी जमीन हडप करण्याकरता हा सगळा खटाटोप त्याने केलेला आहे.

आज रोजी महेश यशवंत भोईर यांच्या वडिलांचे वय हे 75 वर्षे इतके आहे. 1961 सालात महेश यशवंत भोईर यांचे वडील यशवंत जयराम भोईर हे अवघ्या सतरा वर्षाचे असताना स्वतःची शेती सोडून ग्रामपंचायत बोळींज यांच्या मालकीच्या सरकारी जागेवरती अतिक्रमण करण्यासाठी गेले ही बाब न पटण्याजोगी आहे.

हा सगळा पराक्रम महेश यशवंत भोईर ह्या माणसाने केलेला आहे. बोळींज येथील तत्कालीन तलाठी व खाजगी सहाय्यक यांना हाताशी धरून महेश यशवंत भोईर यांनी गाव नमुना 1ई मधील पान बदलण्याचा पराक्रम केलेला आहे.

सरकारी दस्तऐवज गहाळ करणे, सरकारी दस्तऐवजात हेराफेरी करणे, तसेच सरकारी जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून सदर जमिनीवरती अनधिकृत बांधकाम करणे अशी अनेक गुन्हे कृत्ये महेश यशवंत भोईर या इसमाने केलेली आढळतात.

याबाबतीत संबंधित इसमाचे वर गुन्हे दाखल करण्यासाठी आगाशी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री केशव डाया बारी यांनी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांना निवेदन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *