प्रतिनिधी : गास-चुळणा रस्त्यावरील अनधिकृत सायकल ट्रैकवर कारवाईची मागणी करीत वकील जिमी घोंसाल्विस यांनी या प्रकरणी तक्रार करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र सदर प्रकरणी महानगरपालिका आयुक्तांनी कोणतीही कारवाई केली नाही. या संदर्भात वकील जिमी घोन्सालवीस यांनी शासनाकडे तक्रार केल्यानंतर अवर निकिता पांडे यांनी आयुक्तांना पत्र देऊन तक्रारी संदर्भात योग्य ती कारवाई करून कारवाईचा अहवाल शासनास सादर करण्यास सांगितले आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, वसई व नालासोपाऱ्याला जोडणाऱ्या गास चुळणा रस्त्यालगत महानगरपालिकेकडून अनधिकृत सायकल ट्रैक बनविण्यात येत आहे. अनधिकृतपणे भराव करून केलेल्या ट्रैकमुळे पावसाळ्यात पाणी जमा होऊन आजूबाजूची गावे जलमय होण्याची भीती आहे. सदर प्रकरणी प्रदेश कॉंग्रेसचे सदस्य वकील जिमी घोन्साल्वीस यांनी नगरविकास मंत्रालयाकडे दि. २६/३/२०२१ रोजी तक्रार केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने नगरविकास मंत्रालयाने आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका यांना दि. ३०.३.२०२१, दि. ९.६.२०२१, दि. १२.७.२०२१ व दि. १४.९.२०२१ अशी ४ पत्र दिली होती. सदर तक्रारीच्या अनुशंगाने कारवाई करून अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र नगरविकास अवर सचिव निकिता पांडे यांच्या पत्राला आयुक्त गंगाथरन डी यांनी अजिबात जुमानले नाही.आयुक्तांच्या मनमानी कारभाराची अनेक उदाहरणे असून शासनाने गंगाथरन डी यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *