
गिरिज येथे बावखल बुजवणाऱ्याचा निषेध करताना विविध संघटना, पर्यावरण व सामाजिक कार्यकर्ते. १९ ऑक्टोबर २०१९, सकाळी १०:३०
आजच्या बावखल वाचवा आंदोलनाची वसईचे तहसीलदार मा . किरण सुरवसे यांनी त्वरित दाखल घेऊन मंडळ अधिकारी श्री सोनावणे आणि तलाठी श्री दिनेश पाटील यांना जागेवर पाठविले.
मंडळ अधिकारी व तलाठी यांनी रीतसर पंचनामा केलेला आहे. पंचनाम्यामध्ये बावखल बुजविणाऱ्यांचे नावेही दिलेली आहेत. या पंचनाम्यावर मा. तहसीलदार यांनी त्वरित कारवाई करण्याचे कबुल केलेले आहे. तसेच मातीभराव करणाऱ्या ट्रकवर सुद्धा कारवाई होणार आहे.
या आंदोलनात लेंभाट वाडी, गिरिज मधील सर्व गावकरी, डॉमिनिका डाबरे, adv रॉबर्ट डाबरे, समीर वर्तक, प्रसिद्ध पथनाट्यकर झुराण सर व डायगो सर, टोनी डाबरे, सुनील डाबरे, जोएल डाबरे, मॅकेन्झी डाबरे, विक्रांत चौधरी, दर्शन राऊत, जॉर्ज परेरा, डिक्सन रॉड्रिग्ज, ध्यास फाऊंडेशनचे सुरेखा कुलकर्णी व कार्यकर्ते तसेच मनसेचे वसई विधानसभेचे उमेदवार श्री प्रफुल्ल ठाकूर त्यांच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. याप्रसंगी हरित वसई संरक्षण समिती,पर्यावरण संवर्धन समितीे, वसई आणि ग्रीन हॅमर या पर्यावरण विषयी कार्य करणाऱ्या संस्थांचा प्रमुख सहभाग होता.
तसेच सर्वांना विनंती की पर्यावरण वाचवा या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन आपली हरित वसई वाचावी म्हणून आपले योगदान द्यायचे आहे असे समन्वयक पर्यावरण संवर्धन समिती वसई विरार समीर वर्तक यांचे म्हणणे आहे.