

गेल्यावर्षी वसईत उद्भवलेल्या पूरपरिस्थितीला योग्य न झालेली नालेसफाई कारणीभूत असल्याचा आरोप पालिका प्रशासनावर करण्यात आला होता. त्यामूळे यंदा अत्याधुनिक पध्दतीने नालेसफाई करण्याचे काम पालिकेने हाती घेतले होते. मार्च महिन्यापासूनच सुरू करण्यात आलेल्या या नालेसफाईचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. महानगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात 2019-20 या वर्षात 10 कोटी 10 लक्ष नाले सफाईची स्वतंत्र तरतूद केली आहे.पालिका क्षेत्रात एकुण 150 नाले असून 220 किमी त्याची लांबी आहे. त्यातील 40 किमीचे मोठे नाले आहेत.नऊ प्रभाग समित्यांमध्ये एकत्रच नालेसफाईचे काम पालिकेने हाती घेतले आहे.
गेल्यावर्षी वसईत पूरपरिस्थिती का निर्माण झाली.आणि भविष्यात पूरस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेने सत्यशोधन समिती स्थापन केली होती. त्यात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था(निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था(आयआयटी) पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्र(सीईएसई)पर्यावरण संशोधन आणि शिक्षण केंद्र (सीईआरई)आदींचा समावेश आहे. यासमितीने अहवाल सादर केल्यानंतर या अहवालानूसार नालेसफाई करण्यात आली.नालेसफाईमधून निघालेल्या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच भागातील सखोल भागात हा गाळ टाकण्यात येणार.कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी म्हटले होते. मात्र नाल्यातील निघालेला गाळ हा अजून अनेक ठिकाणी तसाच आहे.
मोठ्या नाल्यातून बाहेर काढलेला गाळ नाल्याच्या काठावर रचून ठेवत तो सुकण्याची प्रतीक्षा 15 दिवस करण्यात येते त्यानंतर तो गाळ उचलला जातो,कधी उचलण्यात येतो या बाबत कंत्राटामध्ये समाविष्ट असतात,अशी माहीती पालिकेचे जबाबदार अभियंता यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
नालेसफाई गाळात
नाल्यातून गाळ न उचलण्याची भूमिका
मोठ्या नाल्यातील काढलेला गाळ हा नाल्याच्या किनार्याजवळ राहणार आहे. त्याची वाहतूक करणे अशक्य आहे.तसेच नालेसफाईसाठी कंत्राटदारंना दिलेल्या कंत्राआमध्ये गाळ वाहून नेण्याची तरतूद नाही.-बळीराम पवार महापालिका आयुक्त
नाल्यातील गाळ तसाच ठेवला तर तो पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने पून्हा नाल्यात जातो.आयआयटी व निरी यांना नेमून 12 कोटीचा जो अहवाल महापालिकेने स्विकारला आहे,त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.जर ती झाली नाही तर नालेसफाई नागरिकांची दिशाभूल रणारी आहे.जर गाळाची वाहतूक करणे शक्य नसेल तर त्याचे सपाटीकरण करणे गरजेचे आहे.-मिलिंद चव्हाण, शिवसेना उपशहरप्रमुख
नालेसफाईमधून काढलेला गाळ हा सुकवून त्यानंतर त्याची वाहतुक करण्यात येते.ज्या गाडीने त्याची वाहतूक होते त्या गाडीचा नंबर आणि चलान बनते. तसेच तो कुठे टाकला जातोयाबाबत रेकार्ड ठेवले जाते.त्यानंतरच कंत्राटदाराचे बिल अदा केले जाते.त्यामूळे बाजूला ठेवलेला गाळ पुन्हा नाल्यात जाणार असेल तर महापालिकेने पैशाची नासाडी केली आहे.-मनोज पाटील,जिल्हा उपाध्यक्ष,भाजप