

रिपाइं आठवले गटाचे माजी विरार शहर अध्यक्ष तथा रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष गिरीश दिवाणजी यांनि त्यांच्या समर्थकांसह काल मुंबई येथे रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणिस मा. डॉ. राजेंद्र गवई यांच्या उपस्थित रिपाइं गवई गटात प्रवेश केला.
गिरीश दिवाणजी यांच्या कार्यकालात विरार शहरात अल्पवाढीतच रिपाइं आठवले गटात कार्यकर्त्यांचा जनाधार वाढला होता. जिल्ह्यातील नेतृत्वातील असलेला वैचारिक वाद तसेच देशातील आंबेडकरी समाजाचा रोष पाहता कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी पक्षांच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास ठाम पणे नकार दिल्यामुळे आणि बहुजन विकास आघाडीस जाहीरपणे पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्यावर पक्ष अंतर्गत कारवाईचे पत्रक काढण्यात आले होते . या कारवाईमुळे विरार मधील बहुसंख्य कार्यकर्ते जिल्हा नेतृत्वाच्या हुकूमशाहीचा निषेध करीत रिपब्लिकन चळवळीला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असा निर्धार करीत रिपाइं नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वातील रिपाइं गवई गटात प्रवेश केला. यावेळी गिरीश दिवाणजी यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदी डॉ. राजेंद्र गवई साहेबांनी सन्मान पूर्वक नियुक्त केले. गिरीश दिवाणजी यांच्या नियुक्ती मुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अजून पालघर जिल्ह्यातील काही नाराज कार्यकर्ते लवकरच रिपाइंत डॉ. राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वात प्रवेश करणार आहेत
CONGRATULATIONS MR.GIRIAH. WE ARE WITH YOU.GO ON WITH YOUR MISSION.