
मिरा-भायन्दर, वसई,
तालुका व पालघर तालुका या क्षेत्रामध्ये नागरी वसाहती, गृह संकुले, सोसायट्या यामध्ये झपाट्याने वाढ
होत आहे. यापरिसरात
लहान मोठ्या कंपन्या
मोठ्या प्रमाणात असून कंपन्यायांमध्ये
एकत्रित काम करणारे
कामगार,राजकीय पक्ष/कार्यकर्ते अनेक कामगार संघटना अस्तित्वात असून
गुन्ह्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या परिसरासाठी पोलीस आयुक्तालय
बनविल्यास गुन्ह्याशी संबांधित
प्रकरणामध्ये कमी वेळेत गुन्ह्यांवर प्रभावी प्रतिबंध करणे व कायदा सुव्यवस्था
व्यवस्थित राखणे सुकर होणार आहे. या क्षेत्रामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात
वाढलेले असल्याने या
परिसरातील गुन्हेगारीला आळा बसणे गरजेचे आहे.त्या हेतूणे राज्य शासनाने
या क्षेत्रापुरता पोलीस आयुक्त नेमण्याची अत्यंत गरज आहे.या परिसरात
पोलीस आयुक्त नेमणूक झाल्यास पोलिसांचे प्रमाणवाढेल व गुन्हेगार प्रवृृत्तीचे इसम गुन्हा करण्यास घाबरतील व कायदा सुव्यवस्था सुरळीत चालेल.
तसेच महिलांवर होणाऱ्या
अत्याचाराचे प्रमाण कमी होतील.व गुन्हेगार प्रव्रुत्तीचे इसमास हद्दपार करण्यासपोलिसांना कायदेशीर
कोणतीही अडचण
राहणार नाही.त्यामुळे शासनाने या परिसराकरिता पोलीस आयुक्त यांची नेमणूक करणे गरजेचे आहे या परिसरासाठी शासनाने पोलीस आयुक्तालय जाहीर करून नेमणूक करावी अशी मागणी आम्ही शासनाच्या ग्रूह विभागाकडे केलेली आहे असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शमशुद्दीन खान यांनी सांगितले आहे.