अंनत रंगात! खूपच असता!
सुंदर दिसता! गुलाबच!!

पराग फुलात ! असतं कणात!
पाखरं रानात! उडतात!!

भुंगा शोधतोच! चाखण्या कणाला!
आनंद जीवाला! भुंग्यामुळे!!

दुसऱ्या जीवात ! निर्मिती करतं!
जीवन फिरतं! फुला संग!!

मोहक सुगधं! भरतात रंग!
जीवनात संग! हवा वाटे!!

बागेत फुलतो! मनात भरतो!
सत्कार करतो! फुलानेच!!

लाल हा गुलाब!प्रेमाचं प्रतीक!
भेटून साथीत! देण्यासाठी!!

असता सारेच! आतुर प्रेमात!
असती जोमात! प्रेमवीर!!

फुलांची किमया!मदाला भराया!
येतेच ती घ्याया! मदमाशी!!

प्रदीप सांगतो!वाऱ्यांना सार्यांना!
गुलाब फुलांना! जपायचं!!

प्रदीप मनोहर पाटील
गणपूर. जळगाव
मो. 9922239055

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *