
पालघर दि. २८ : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार बंगालच्या समुद्रात वादळ (गुलाब चक्रीवादळ) निर्माण झाल्याने दिनांक १ ऑक्टोबर २०२१ पर्यत कोकण किनापट्टीलगतच्या जिल्हयातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केले आहे.
याकाळात झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, पाणी साचणे, विजेचे खांब कोसळणे, पुरात वाहून जाणे, विज पडून मृत्यु, जनावरे वीज पडून, पाण्यात बुडन मयत होणे, अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच संबंधित गावातील तलाठी यांना घडलेल्या घटनेचा वृतांत तात्काळ कळविणे, व तालूका नियंत्रण कक्षात फोन करणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात 8237978873 या क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केल्या.
तालुका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
Dahanu 9607744258
Vikamgad 8806898565
Jawhar 8552918405
Mokshada 8446335908
Wada 02526271431
Talasari 02521220036
Vasai 02502322007
Palghar 02525254930