
वसई (प्रतिनिधी) :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका पुरवठा विभागात प्रचंड काळाबाजारी चालत असून सर्व सामान्य गोरगरीब जनतेच्या हक्काचे धान्य भाताने येथे प्रफुल्ल नाईक यांच्या मिलमध्ये जात असल्याचे वृत्त आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी युवा शक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला यांनी केली आहे. सदर बाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह तमाम संबंधितांना ईमेल द्वारे तक्रारी केल्या आहेत.
पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका पुरवठा विभागात फार मोठा भ्रष्टाचार चालत असून सर्व सामान्य गोरगरीब जनतेच्या हक्काचे धान्य काळ्याबाजारात विकले जाते. भाताने येथील प्रफुल्ल नाईक यांच्या मिलमध्ये धान्य पाठविले जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. जिल्हा पुरवठा विभागाने याबाबत सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. त्याचप्रमाणे प्रफुल्ल (पप्पू ) नाईक हा सिल्वर किंग नावाने पिठाच्या पिशव्या बाजारात विक्री करीत असून संबंधित विभागाकडून प्रफुल्ल नाईक याने परवाना घेतला आहे का याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी रुबिना मुल्ला यांनी केली आहे.
सदरबाबत युवा शक्ती एक्सप्रेसमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रफुल्ल नाईक याचे या संदर्भात असे म्हणणे आहे की, २ वर्षांपूवी वसई पुरवठा कार्यालयाकडून प्रफुल्ल नाईक धान्य घेत असे. मात्र वसई पुरवठा विभागाकडून मिळणारे धान्य महाग असल्यामुळे त्याने वसई पुरवठा विभागाकडून धान्य खरेदी बंद केली.
सदर गैर व्यवहाराची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी.