वार्ताहर – महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग, जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती वसई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद गोवर्धन विद्यालय, पापडी येथे “शाळा पूर्व तयारी आनंद मेळावा” मोठ्या उत्साहात साजरा झाला.

   पालकांचा सध्या पाल्यांना शिक्षणाकरिता असलेला इंग्रजी शाळेचा कल लक्षात घेता महाराष्ट्र शासन सदर "शाळा पूर्व तयारी आनंद मेळावा" संपूर्ण राज्यात साजरा करत असते. यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी या मेळाव्यात केली जाते. हसत खेळत शिका व शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती माहिती देण्यात येते. मराठी शाळांची टक्केवारी वाढावी यासाठी शासनाचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.

   पालकांनी जिल्हा परिषद शाळे कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा इंग्लिश माध्यम शाळेमध्ये फक्त  फि चा भडिमार केला जातो पण जिल्हा परिषद शाळेमध्ये जेवण पुस्तक गणवेश आणि ज्ञान सुद्धा आपल्या भाषेमध्ये चांगले दिले जाते आणि त्याचा उपयोग भविष्यामध्ये फायदा नक्कीच मुलांना होतो तसेच आपली संस्कृती आपले सण याबद्दल सुद्धा माहिती मिळते नुसतं इंग्लिश माध्याम शाळे मध्ये दाखल होऊन स्पर्धा करण्यापेक्षा आपली मुलं आपल्या भाषेमध्ये चांगले शिकून त्यांचा पाया मजबूत कसा होईल हे लक्षात आले पाहिजे. आपणही आपल्या भाषेच्या शाळेत शिकलो म्हणून आपण इंग्रजी माध्यम शाळेची फी भरण्याच्या हिंमतीचे बनलो. आजच्या कार्यक्रमात सौ रोशनी गणेश वाघ, अरुण बापट स्वयंसेवक म्हणून लाभले. सौ चेतना राऊत व सौ रेश्मा पाटील या अंगणवाडी सेविका यांचं सहकार्य लाभले.

भाषेचा न्यूनगंड न बाळगता पाल्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमात शिकवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.

— सौ रोशनी गणेश वाघ
आमची वसई – महिला संघटक

पालकांनी जिल्हा परिषद शाळे कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा व विद्यार्थी पट वाढवा यासाठी शासनाचा हा स्तुत्य उपक्रम आहे.

— श्री सखाराम भूमकर (मुख्याध्यापक – गोवर्धन जिल्हा परिषद शाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *