प्रतिनिधी : भारत देशात कोरोना व्हायरस ची स्थिती पाहता अनेक नागरीकांचे मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. शासन प्रशासनाचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. त्यातच पोलीसाचे कार्य पाहता आज आपला जीव धोक्यात घेऊन पोलीस यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. दिवस-रात्र आपली दुटी करत आहेत त्यांना भोजनासाठी सुध्दा वेळ मिळत नाही. त्या अनुषंगाने गौतमनगर, निर्मळ गावातील नागरीक एकत्र येऊन गावातच भोजन बनवून नालासोपारा पश्चिम पोलीस स्टेशन, भुईगाव पोलीस चौकी, सनसिटी पोलीस चौकी, माणिकपूर पोलीस स्टेशन, वसई अंबाडी वाहतूक पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केद्र (निर्मळ) या सर्व ठिकाणी पोलीसाना भोजनाची व्यवस्था केली. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी भोजनाचे कौतुक केले व सल्ला दिला की ग्रामीण भागातील अनेक आदिवासी पाडे आहेत त्याठिकाणी सुध्दा असाच उपक्रम घेण्याची गरज आहे आणि सांगितले तुम्ही केलेल्या आजच्या कार्यास आमचा सेलुट आहे. सदर भोजनाचे महत्त्वाचे स्थान जाते ते म्हणजे समाजसेवक श्री.सन्नी डिसोजा आणि गौतम नगर मधील तरूणांनी त्यांना साथ दिली भोजनाचा उपक्रम यशस्वी केला. सन्नी डिसोजा हे अनेक समाज उपयोगी उपक्रम घेत असतात व अनेक नागरीकाना मदत करत असतात त्यांना समाज कार्यास खुपच उत्साहीत असतात गोर गरीबाना मदत करणे त्यांना खुपच आवडते. सदर उपक्रम यशस्वी करण्यास यशवंत चव्हाण, राकेश चव्हाण, हरेश मोहिते (पत्रकार), अनंत चव्हाण, नितीन मोहिते, मंगेश मोहिते, अशोक राऊत, कुणाल मोहिते, सुरेश वाघमारे, नयन देवळेकर, गणेश मोहिते, विशाल सदाफुले, निलेश मोहिते, निशांत देवळेकर, मनोज मोहिते, वैभव राऊत, सुधीर पवार, किरण डिसोजा, अविनाश काळे यांचे मोलाचे योगदान राहिले. सदर कार्यक्रमाचा प्रमुख सल्ला दिला तो म्हणजे कृष्णाजी चव्हाण, गणपत मोहिते, चंद्रकांत चव्हाण, बाळकृष्ण मोहिते, रघुनाथ मोहिते यांनी मोलाचा सल्ला दिला व कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *