प्रतिनिधी : रविवार दिनांक १८.०९.२०२२ रोजी गौतम नगर, निर्मळ गावात तालुका विधी सेवा समिती, वसई आणि वसई वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबीर कार्यक्रम संपन्न झाले. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आदरणीय एस. डी. हरगुडे साहेब,५ वे दिवाणी न्यायाधीश क स्तर, वसई कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय एस. एस. जयस्वाल साहेब ६ वे दिवाणी न्यायाधीश क स्तर, वसई हे सुध्दा उपस्थित होते. आदरणीय एस.एस.जयस्वाल साहेबांनी कार्यक्रमात एच. आय. व्ही आणि शारीरिक आजारांचे प्रसारित रोग या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करून सदर आजारापासून वाचण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे यावर माहिती दिली. अँड. स्टॅनली फर्नांडिस यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा या विषयावर माहिती दिली. अँड. हरीश गौड यांनी कैद्यांचे अधिकार या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. अँड. चेतन भोईर यांनी अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा यावर माहिती देताना सदर कायद्याचा गैरवापर कशा प्रकारे होतो या विषयावर जमलेल्या नागरीकाना पटवून दिले. याप्रसंगी मंचावर अँड. वैभव पाटील अँड. काजल पाटील, अँड. शाहिद अलमेलकर, अँड. विजय केलसकर उपस्थित होते सदर कार्यक्रमाची प्रस्थावना कृष्णाजी चव्हाण यांनी केली. त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरेश ग. मोहिते यांनी केले. कार्यक्रमाच्या शिवटी आभार प्रदर्शन गौतम नगर चे अध्यक्ष मंगेश क. मोहिते यांनी केले. सदर कार्यक्रमात गौतम नगर व निर्मळ विभागातील वेगवेगळ्या संस्थेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *