
वसई प्रतिनिधी : गौतम नगर, गास (निर्मळ) रहिवासी संघा तर्फे दि. १७ जानेवारी २०२२ रोजी पौष पोर्णिमा साजरी करण्यात आली. बौद्ध धर्मा मध्ये पोर्णिमेला विषेश महत्त्व आहे. विषेशतः म्हणजे गौतम नगर येथे दर महिण्याचे पोर्णिमा हि उत्साहात साजरी केली जाते पोर्णिमा हि प्रत्येकांच्या घरी सामुहिक रित्या साजरी केली जाते. हया महिण्याची पौष पोर्णिमा हि गौतम नगर मध्ये पुर्वी पासून राहणारे आदिवासी बांधव यांनी हया महिण्याची पोर्णिमा उत्साहात साजरी केली. पोर्णिमा कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीस पुष्प व पुष्पहार अर्पण करून बौध्द वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. वसई तालुक्यातील नऊ गाव पश्चिम विभागातील भिम प्रेरणा जागृती संस्थेचे पदाधिकारी व भारतीय बौद्ध महासभा शाखा वसई तालुका पश्चिम विभागातील पदाधिकारी व अनेक मान्यवर यांचे गौतम नगर, गास (निर्मळ) रहिवासी संघा तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तेथील आदिवासी मुलानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावर उत्कृष्ट नृत्य सादर केले. त्याच प्रमाणे तथागत गौतम बुद्ध यांची अप्रतिम अशी रांगोळी जागृती लक्ष्मण हाडळ, वनिता हाडळ, पुजा विलास गडक यांनी रांगोळी काढून लोकांचे मन जिंकले. उपस्थित मान्यवर व पदाधिकारी यांनी पौष पोर्णिमेचे महत्त्व पटवून आपले मनोगत व्यक्त केले. पोर्णिमा कार्यक्रमात पुढील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते भिम प्रेरणा जागृती संस्था (नऊ गाव वसई पश्चिमचे) अध्यक्ष अँड.चेतन हे.भोईर, सेक्रेटरी महेश ब.जाधव (आंबेडकर नगर, भुईगाव डोंगरी) गौतम नगर रहिवासी संघाचे संस्थापक कृष्णाजी चव्हाण, चंद्रकांत स. चव्हाण, भारतीय बौद्ध महासभा शाखा वसई चे संस्कार विभाग किरण जाधव (आंबेडकर नगर, नाळा), नरेश तांबे (संस्कार विभाग), हिशोब तपासणीस राकेश चं.चव्हाण, शुभांगी अनंत चव्हाण (महिला सचिव), रंजना राकेश चव्हाण (महिला विभाग) संघटक : राज चव्हाण असे अनेक पदाधिकारी व गौतम नगर रहिवासी संघाचे महिला, तरूण, वरिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोर्णिमा कार्यक्रम यशस्वी रित्या पारपाडण्यासी गणेश भिवा हाडळ, लक्ष्मण हाडळ, वनिता हाडळ, वंदना लक्ष्मण हाडळ, गिरीजा सांबरे, सुशिला गडक, साधना वरठा, संगिता बाबू हाडळ, माळती संजू हाडळ, सुरेखा सुरेश पवार, सुशिला गडक या सर्वानी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरेश गणपत मोहिते यांनी केले व आलेल्या सर्व पाहुणे मंडळी मान्यवर यांचे आभार मानले.