
वसई प्रतिनिधी : भारतीय बौध्द महासभा-शाखा वसई तालुका पश्चिम विभाग व भीम प्रेरणा जागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गौतम नगर गास, (निर्मळ) येथे क्रांतीस्तंभाची प्रतिकृती स्थापन करून शूरविरणा मानवंदना देण्यात आली. सदर कार्यक्रमात मेजर पालघर बटालियन, पालकमंत्री वसई तालुका तसेच बौद्धचार्य आद. संतोष जाधव गुरुजी व वसई तालुका पश्चिम शाखा व गौतम नगर अध्यक्ष : आयु. मंगेश क. मोहिते, भारतीय सैन्यतुन निवृत्त झालेले विक्रम ब्राम्हणे वसई तालुका पश्चिम शाखेचे संरक्षण विभाग उपाध्यक्ष व सैनिक : रत्नाकर वागळे, शाखेच्या महिला विभाग उपाध्यक्ष आयुनी अश्विनी मोहिते, हिशोब तपासणीस : राकेश चव्हाण, विभाग सचिव : शुभांगी अनंत चव्हाण, सैनिक : रंजना राकेश चव्हाण, गिता अशोक राऊत, लिला (इदा) जाधव, सैनिक : अनंत चव्हाण, हरेश मोहिते, निखिल तांबे, तसेच वसई तालुका पश्चिम शाखेचे पदाधिकारी व गौतम नगर, गास (निर्मळ) रहिवासी संघाचे संस्थापक : आयु. कृष्णाजी चव्हाण व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.