दापोली तालुक्यातील ग्रामविकास मंडळ गोविंदशेतवाडी पांगारी चषक २०२२ रविवार दि २४ एप्रिल २०२२ कळवा पठणी (ठाणे) मैदान येथे नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेचे नियोजन ग्रामविकास मंडळ गोविंदशेतवाडी (मुंबई ) मुंबई मंडळाचे अध्यक्ष राजेश मांजरेकर, उपाध्यक्ष दत्ताराम मांजरेकर सचिव राजेश लोंढे ,सहसचिव रवींद्र चव्हाण ,खजिनदार हरिचंद्र शिबे , सह खंजिनदार संदेश चव्हाण ,संलग्न क्रीडा समिती अध्यक्ष अशोक भागणे , उपाध्यक्ष अनिल मांजरेकर ,महेश लोंढे ,कार्याध्यक्ष सुनिल मांजरेकर , शांताराम चव्हाण ,सचिव प्रदिप मांजरेकर , सहसचिव किरण मांजरेकर ,दिनेश मांजरेकर खजिनदार सुभाष चव्हाण ,सहखजिनदार – कु. सचिन चव्हाण व सर्व सदस्य ….. ग्रामीण अध्यक्ष सोनू चव्हाण ,सचिव केशव भागणे , सहसचिव – मनोहर शिबे , माजी सरपंच सौ. शालिनीताई केशव भागणे व ग्रामीण सदस्य आदी उपस्थित होते . या स्पर्धेचा प्रथम विजेता मानकरी संघ ठरला सुपरकिंग रुखी संघ व व्दीतीय विजेता संघ सद्गुरू क्रिकेट संघ दाभीळ मोरेवाडी आणि तृतीय विजेता संघ नवयुग क्रिकेट संघ गोविंदशेतवाडी पांगारी , या स्पर्धेचे पूर्ण समालोचन मनीष लोंढे यांनी केले व सदर स्पर्धेला मुबई मंडळ पांगारी गावाचे विद्यमान अध्यक्ष यशवंत पडवळ ,सचिव योगेश खापरे, क्रीडा समिती अध्यक्ष मनीष भागणे ,युवा मार्गदर्शक महेश भागणे साहेब, १८ गाव उन्हवरे विभागामधून श्री. आर पी जाधव ,सुनिल चव्हाण, राहुल मांजरेकर ,नितीन पोसरेकर , भावेश लोंढे , ग्रामीण सचिव भरत आयेरे, कमलाकर खापरे साहेब , सुरेश पोसरेकर ,गोपाळ शिबे , कमलाकर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.