पुणे(मंचर):- पुणे जिल्हा कोरोनाचा हॉट स्पॉट होत असताना अनेक पत्रकार व पत्रकारांना कोव्हिडं सेंटर ला राखीव बेड उपलब्ध नसतात हा विषय मांडत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांना कोव्हिडं सेंटर मध्ये राखीव कोटा असावा अशी नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट या संघटनेची मागणी असून याबाबतचे निवेदन
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,कामगार मंत्री दिलीप वळसे यांना मंचर(ता.आंबेगाव) इथे निवेदन देताना नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट पुणे(NUJM) चे पदाधिकारी पुणे ग्रामीण चे सदस्य रोहिदास गाडगे(Etv भारत),खेड तालुका अध्यक्ष सुनील थिगळे(जय महाराष्ट्र),जिल्हा कार्याध्यक्ष रायचंद शिंदे(News 18 लोकमत).
यावेळी जिल्हाधिकारी देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यापुढे सर्व पत्रकारांना किंवा त्यांचा कुटुंबियांना राखीव बेड उपलब्ध असतील असा शब्द दिला आहे.याबद्दल nujm च्या राज्य अध्यक्ष शीतल करदेकर यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांचे संघटनेच्या वतीने आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *