वसई : (प्रतिनिधी) : यंदाच्या अतिवृष्टीत वसई पूर्वेतील ग्रामीण भाग पुराखाली गेला आहे. सध्या येथील जनजीवन पुर्वपदावर येत असले तरी पुराच्या पाण्यामुळे मोबाईल टॉवरचे नुकसान झाल्याने ग्रामीण भागातील मोबाईल सेवा वारंवार खंडित होऊ लागली आहे. रेंज न मिळणे, संपर्क न होणे तसेच इंटरनेटसंदर्भातील अनेक तांत्रिक अडचणी यामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. यासंदर्भात पालघर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी वसईचे तहसिलदार किरण सुरवसे यांची भेट घेऊन निवेदन सादर करून परिस्थिती सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
वसईतालुक्यातील शिरवली ,पारोळ, घाटेघर, सायवन, चाळीसगाव, आंबोडे, भिनार, मेढे, वडघर, कळंभोण, साखरपाडा, प्लॉटपाडा, ईनामपाडा, आडणे व ईतर लहान-मोठे पाडे यांचा जनसंपर्काचे साधन म्हणजे मोबाईल आहे. परंतु या सायवन विभागातील वोडाफोन, आयडीया, जिओ, बिएसएनएल या कंपन्यांचे टॉवर हे नदीकिनारी खोलगट जागेत असल्यामुळे पुराचे पाणी टॉवरच्या केबीन मध्ये घुसल्याने पाच दिवस झाले तरी पुर्ववत झाली नाही. कंपन्याच्या चुकीच्या धोरणामुळे येथील आदिवासी बहुल गावांतील जनतेला नाहक त्रास होत आहे म्हणुन माजी खासदार बळीराम जाधव, प्रथम खासदार पालघर लोकसभा यांनी सुरवसे, तहसिलदार, वसई यांना निवेदन देऊन सदर अत्यावशक सेवा पुर्ववत व सुरळीत करावी व सदर टॉवर दुसर्‍या जागेत उभारण्यात यावेत जणेकरुन येथील गरीब जनता रेशनिंग चे धान्य वेळच्यावेळी घेऊ शकतील व इतर लोकांशी संपर्क होऊ शकेल. जर सदर सेवा लवकरात लवकर सुरु झाली नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा यावेळी तहसिलदारांना देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *