

दि.०८ नोव्हेंबर २०१९
वसई (प्रतिनिधी) – शिवसेनेच्या उपतालुका संघटक देवयानी मेहेर, विभागप्रमुख प्रथमेश बावकर, विभागसंघटक क्लेरा कोतवाल, उपविभागप्रमुख देवेंद्र वैती, शाखा अधिकारी सिमोल कोतवाल आणि उपशाखाप्रमुख डेनिस गुरग्या यांनी पुढाकार घेत वसई तालुक्यातील पाचुबंदर, किल्लाबंदर, नायगाव, कळंब, खोचिवडे, अर्नाळा किल्ला आणि अर्नाळा ग्रामीण भागातील मच्छीमार आणि शेतकरी समाजाचे अवेळी सतत पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी आपण ग्रामस्थांसाठी सर्वोतोपरी मदत करावी असे निवेदन पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांना वसई येथे देण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे वसई तालुक्यातील नुकसान झालेल्या या आगरी, कोळी आणि ग्रामीण भागातील मच्छीमार – शेतकरी समाजास अद्याप कुठल्याही प्रकारची स्थानिक प्रशासनातर्फे मदत मिळालेली नाही. सदर समाजास उपजीविकेचे हे एकमात्र साधन असल्यामुळे आधीच पावसाळ्यात मासेमारी व्यवसाय बंद आणि त्यात अवेळी पडलेल्या पावसामुळे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर विषयावर मी विशेष प्रयत्न करेन असे खात्रीपूर्वक आश्वासन खासदार गावित यांनी दिले.
