
अध्यक्षा व उपाध्यक्ष यांनी शिक्षकांना घेतले फैलावर
पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगती सुमार असल्याने अचानक भेटी देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढण व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे यांनी शाळेची तपासणी करून शिक्षण विभागाला आसामाधान कारक कामगिरीबद्दल फैलावर घेतले. दोघांनीही जव्हार मोखाडा तालुक्यातील शाळांना भेटी देत शिक्षण विभागाचा आढावा घेतला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी जव्हार तालुक्यातील तळ्याचापाडा येथील शाळेला भेट देत विद्यार्थ्यांची प्रगती तपासली असता ती असमाधानकारक व खुपच कमी असल्याचे आढळल्याने या वेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली.विद्यार्थ्यांच्या वह्या तपासल्या असता विद्यार्थ्यांनी सोडवलेली गणिते चुकीचे असल्याचे त्यांना आढळून आले आणि शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांच्या वह्या तपासत नसल्याचे भेटीत निदर्शनास आले आहे. विद्यार्थी शाळेत गैरहजर असतांना त्यांची हजेरी लावल्याचे वास्तव भेटीदरम्यान उघड झाले.
कुंडाचापाडा या शाळेला भेट दिली असता एका केंद्र प्रमुखांच्या निरोप समारंभला सर्व मुख्यडग्यापक व शिक्षकवर्ग शाळा बंद करून व शाळेला लवकर सुट्टी देऊन गेल्याचे दिसल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली व कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम व इतर जण उपस्थित होते. मुख्याध्यापक सहविचार सभेचे कारण सांगत सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद शाळा सोडून दिली. मोखाडा तालुक्यातील साखरी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला सुध्दा भेट देत पाहणी करण्यात आली.भेटीच्या वेळी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थींनी जेवण करत होत्या.यावेळी जेवणामध्ये चपाती हा मेनू असताना चपाती नसल्याचे निदर्शनास आले .बऱ्याच दिवसापासून चपाती देण्यात येत नसल्याचे यावेळी विद्यार्थींनीकडुन समजले.तर फळांमध्ये सफरचंद हा मेनू असताना सफरचंद दिले जात नसल्याचे चौकशी दरम्यान समोर आले आहे.यावेळी एक महत्वाची माहीती समोर आली व ती म्हणजे मानव विकास व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनी या एकत्र राहतात.मात्र मानव विकास विभागाचे अन्नधान्य प्रत्यक्षात आणले जात नसून बिल मात्र काढले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या वेळी आणखी एक गोष्ट लक्षात आली की विद्यार्थींनींना प्रमाणानुसार दुध दिले जात नाही.जेवणात विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असावा असे असताना वारंवार दोन ते तीन प्रकारच्या भाज्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या.द्राक्षे,पेरू, लिंबू,गाजर ही फळे दिली जात नसल्याचेही यावेळी समजले.विद्यार्थ्यांना वेळापत्रकाप्रमाणे सकस व पौष्टिक आहार दिला गेलाच पाहिजे असे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरेंनी यावेळी शाळा प्रमुखांना खडसावले.
भेटी दरम्यान समोर आलेल्या वास्तवाच्या अनुषंगाने वैदेही वाढाण व ज्ञानेश्वर सांबरे व जि प सदस्य प्रकाश निकम यांनी आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड कदापि सहन केली जाणार नाही.जिल्ह्यातील आदिवासी व गोरगरिबांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही कटीबद्ध असुन जर कोणी हलगर्जीपणा करून त्यांचे शैक्षणिक नुकसान करु पाहत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.कुणाचीही गय केली जाणार नाही असे शिक्षक वर्गाला खडसावले.कोरोना काळातील शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी अधिकची मेहनत घेण्याचे आवाहन यावेळी जि प अध्यक्ष वैदेही वाढाण व जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना केले आहे.
प्रतिक्रिया:
पालघर जिल्ह्यातील डोंगरकपारीतील,तळागाळातील आदिवासींची,गोरगरीबांची मुले देशाच्या पटलावर चमकतील या भूमिकेतून शिक्षकांनी अध्यापन करा, त्यातच आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना समाधान आहे.शिक्षणासाठी कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही.
वैदेही वाढाण,अध्यक्षा,जि.प.पालघर