वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन अमेरिका यांच्या वतीने देण्यात येणारा 2025 चा पुरस्कार ग्रेट लेडी इंटरनॅशनल पुरस्कार पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या व रिपब्लिकन बहुजन परिषदेचे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा देविकाताई चव्हाण यांना अहिल्यानगर येथील श्रीरामपूर येथे चित्रपट अभिनेता व दिग्दर्शक प्रदीप गोपटे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता,
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक डॉ दत्ता विघावे अध्यक्ष( wcpa) वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड्स, माजी अभियंता व साजिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग शेलार, रिपब्लिकन बहुजन परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदीप भंडारी, सुनील सकट, गायत्री मस्के, सुहास पाटील, सुधीर कोरे, हेमंत कुमार, ओगले नितीन दिनकर, सतीश अहिरे, शिवाजी होंगे, आदि यावेळी उपस्थित होते,
देविका चव्हाण अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असून गोरगरिब महिलांना न्याय हक्कासाठी लढत असतात,
अनेक महिलांचे संसार जोडून त्यांना न्याय मिळवून दिला, पुणे शहरातील झोपडपट्ट्यांमधील मुला मुलींना शिक्षणासाठी पुढाकार घेत त्यांना शिक्षणाची ओढ लागावी म्हणून मार्गदर्शन करत आहे, महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार यासाठी त्यांनी संघटनेच्या वतीने अनेक आंदोलन मोर्चे काढून त्यांना न्याय देण्याचा काम केले त्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *