वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ शेख यांचा निर्धार

प्रतिनिधी

विरार- आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात ‘घरोघरी तिरंगा` हा उपक्रम 12 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. देशाप्रतिचे आपले प्रेम, आदर व स्वातंत्र्याकरता हौतात्म्य पत्करलेल्या आपल्या सैनिक बांधवांप्रति सन्मान व्यक्त करण्याकरता आपण सर्वजण या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊ या, असा निर्धार वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ शेख यांनी केला आहेे.

‘घरोघरी तिरंगा` या उपक्रमाच्या अनुषंगाने वसई-विरार महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समिती कार्यालयांमधून नागरिकांना मोफत झेंडा वाटप करण्यात येत आहे. याशिवाय पालिकेच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

झेंडा वाटप करण्यासाठी सर्व प्रभाग समिती कार्यालयांत व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागरिकांना जवळच्या प्रभाग समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत जाऊन तेथे नोंदणी करून झेंडा प्राप्त करून घेता येणार आहे. नागरिकांनी ध्वजसंहितेचे पालन करून 13 ऑगस्ट 2022 रोजी झेंडा सन्मानाने लावावा व उपक्रम कालावधी संपल्यानंतर म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी सन्मानाने उतरवून ठेवावा. त्यानंतर नागरिकांनी ज्या प्रभाग समिती कार्यालयातून झेंडा प्राप्त केला आहे; त्याच ठिकाणी झेंडा परत करावा, असे पालिकेने सूचित केलेले आहे.

या अभियानाच्या यशस्वीतेसाठी व आपल्या देशाप्रति प्रेम, आदर आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊ या, असे आवाहन शेख यांनी केले आहे.
…………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *