
‘
उत्तम कुमार यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिल्सन घोन्सालवीस यांच्या हस्ते तिरंगा स्वीकारुन केला शुभारंभ!
वसई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 वर्षानिमित्त ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ कार्यक्रम संपुर्ण देशभरात साजरा करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभुमीवर भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वसई नवघर परिसरात दहा हजार परिवारांपर्यंत तिरंगा पोहोचवण्याचा भाजपाचा संकल्प असल्याचे उत्तम कुमार यांनी सांगितले. या कार्यक्रमाचा आज उत्तम कुमार यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिल्सन घोन्सालवीस यांच्या हस्ते तिरंगा स्वीकारुन शुभारंभ केला.
उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व माझे प्रेरणास्थान देवेंद्र फडणवीस यांना आदर्श ठेऊन हा कार्यक्रम हाती घेतला आहे. देशाच्या तिरंग्याचे महत्तव प्रत्येक थोरा मोठ्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा मानस आहे. विशेष करून मी वसई-विरार महानगरपालिकेचे आभार मानतो की, त्यांनी तिरंग्याचे विशेष सहाय्य केले आहे. दहा हजार परिवारांपर्यंत तिरंगा पोहचवण्याच्या माध्यमातून अंदाजे चाळीस हजार नागरीकांपर्यंत तिरंगा पोहचवण्याचे एक लक्ष माझ्या मनात आहे. ज्यासाठी आपला हातभार गरजेचा आहे. असे यावेळी ते म्हणाले.
भाजपाकडून दिनांक 14 ऑगस्ट रोजी ब्रॉडवे सिनेमागृह ते संपुर्ण नवघर परिसर अशी एक बाईक रॅली काढण्यात येणार आहे. तसेच 15 ऑगस्ट रोजी वसई तालुक्यात 25 सार्वजनिक ठिकाणी झेंडावंदन साजरे करण्यात येणार आहे.