
प्रतिनिधी :
पालघर जिल्हा वसई तालुका हद्दीत घोडबंदर रेती बंदरात काका भोईर नामक रेती माफिया बेकायदेशीरपणे रेती उपसा करून सरकारचा महसूल बुडवून सरकारची फसवणूक करीत असल्या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी युवा शक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला यांनी केली आहे.
हाती आलेल्या माहिती नुसार घोडबंदर रेती बंदरातून काका भोईर बेकायदेशीरपणे प्रचंड रेती उत्खनन करून सदरची रेती बांधकाम व्यावसायिकांपर्यंत पोहोचवून सरकारचा महसूल बुडवून सरकारची फसवणूक करीत आहे. त्याच्या या कृत्यात महसूल अधिकारी, पोलिस व वाहतूक विभाग अधिकारी सामील आहेत. या अधिकाऱ्यांच्या संरक्षणात कित्येक वर्षांपासून काका भोईर सरकारचा महसूल बुडवून सरकारची फसवणूक करीत आहे. त्याने यातून करोडोची बेहिशोबी संपत्ती जमविली आहे. सदर प्रकरणी कठोर कारवाई व्हावी.