
ब्रिटिशांच्या राज्यात ब्रिटिशांनी मिठाला कर लावला म्हणून अक्खा देश ब्रिटिशांच्या विरोधात एकवटला आणि ब्रिटिशांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. ब्रिटिशांच्या तथाकथित गुलामिच्या जोखडातून म्हणे भारतीयांनी स्वतःला स्वतंत्र केले.
परंतू स्वतंत्र भारतात काळ्या ब्रिटिशांनी भारतीयांचं हगणं-मुतणंही महाग केलं. दिवसाढवळ्या हगण्यासाठी दोन रूपये आणि मुतण्यासाठी एक रूपया उकळण्याचं काम राज्याच्या मंत्रालयाशेजारील चर्चगेट रेल्वेस्थानकात दिवसाढवळ्या चालत होतं.
मिठावरील करामूळे ब्रिटिशांची गुलामी करीत असल्याची भावना असलेले तेच भारतीय स्वकियांनी हगणं-मुतणंही महाग केलेलं असताना हगण्या-मुतण्यावरील हा कर खाली माना घालून भरीत आपली नैसर्गिक गरज भागवीत होते. मग हा काय भारतीयांचा स्वाभिमान आहे काय?
हे तर ब्रिटिशांपेक्षाही कृर कर्म स्वाकियांकडून अनुभवायला मिळत होतं आणि कोणी ना कोणी यावर आवाज उठवून संबंधीत रेल्वे व्यवस्थापनाला याचा जाब विचारणं अपेक्षित होतं.
अशा या स्वकियांच्या कृरकृत्यावीरोधात जाब विचारून त्यांना हगण्या-मूतण्यावरील हा कर मागे घेण्यासाठीचा विडा अपेक्षेप्रमाणे इंडियन बार असोसिएशन या वकिलांच्या संघटनेचे महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष अॕड. विजय कुर्ले यांनी उचलला.
अॕड. कुर्ले यांनी ब्रिटिशांनी लावलेला मिठावरील कर, त्यातून उभा राहिलेला स्वातंत्र्य लढा याची आठवण रेल्वे प्रशासनाला करून देत त्यांना त्यांच्या या अमानवीय कृतीबद्दल खडे बोल सुनावले. रेल्वे व्यवस्थापनाने अॕड. कुर्ले यांचा या अमानवीय कृत्याविरोधातील पवित्रा लक्षात घेऊन ताबडतोब तो दर-फलक सुरवातीला झाकून टाकला व नंतर तो उखडून टाकून मोफत मुतारीचा फलक लावला.


