सध्या महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून कोल्हापूर, सांगली आणि सातरा येथे भयानक पूरस्थिती उद्भवली आहे. या पूरस्थितीमूळे तिथल्या स्थानिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं असून त्यांना सलग चार दिवस काही खायला मिळाले नाही आहे. म्हणून या पूरस्थितीला चार दिवस उलडून गेल्यानंतर माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शुक्रवारी मंत्रालयात या घटनेबाबत पत्रकार परिषद घेतली. या परिषदेतून पूरग्रस्त भागतील नागरिकांना कशा प्रकारे मदत केली जाणार आहे आणि मदत केली आहे हे सांगण्यात आले. पूरग्रस्त भागातील नागरीकांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने १५४ कोटी रुपये मुख्यमंत्री यांच्या आदेशाने वितरीत करण्यात आले आहेत. हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबीट करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जेणेकरुन मदत कार्याला निधीची कमतरता जाणवणार नाही, असं अजोय मेहता माहीती मुख्य सचिव यांनी सांगतिलं आहे.
तसेच पूरग्रस्त भागात सर्पदंशावरील लसी देण्यात आल्या असून कोल्हापूरमध्ये १२ हजार तर सांगलीमध्ये ५ हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. लेप्टोवरील उपायांच्या सांगलीमध्ये ८ लाख आणि कोल्हापूरमध्ये १२ लाख डॉक्सीसीन गोळ्या देण्यात आल्या आहेत. तसेच ३० लाख गोळ्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा व अन्य जिल्ह्यामध्ये महापूरस्थिती निर्माण झालेली असल्याने तेथील नागरिकांना माणुसकीच्या नात्याने मदत करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.त्यामुळे आपण सर्वांनी मिळून जे काही आपल्याकडून निधी रक्कम ऑनलाईन मुख्य मंत्री सहाय्यता निधीत देणगी देता येईल ती देणगी देवून महापूर परिस्थितीतील नागरिकांसाठी मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे येण्याची अत्यंत गरज आहे.बारामती मधून आदरणीय शरद पवार यांनी महापुर परिस्थितील नागरिकांना मदत करण्याची हाक दिली असता एका तासात तेथील नागरिकांनी एक कोटीची देणगी पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून दिली यालाच म्हणतात माणुसकी.माणुसकी हाच खरा धर्म आहे.आज राज्यातील पुरस्थितील नागरिकांना आपल्या सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे.तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपली देणगी द्या त्याचा तपशील खालील प्रमाणे ….
खाते क्रमांक 10972433751
भारतीय स्टेट बँक फोर्ट शाखा, मुंबई
IFSC कोड SBIN0000300
पॅन क्रमांक : AAATC0294J
युपीआय : cmrelieffund.mh@sbi
ऑनलाईन देणगीसाठी https://cmrf.maharashtra.gov.in

वर वर्णन केलेला अकाऊंट नंबर हा मुख्यमंत्री सहाय्यता देणगी निधी नागरिकांनी द्यावे यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेले आहे. सर्व नागरिकांनी जे काही होईल ती आर्थिक देणगी मदत देवून पुरस्थितील नागरिकांना मदतीचा हात द्यावा अशी विनंती शमशुद्दीन खान यांनी नागरिकांकडे केली आहे.
राज्य सरकार पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचं काम वैद्यकीय पथकांमार्फत करीत आहे. कोल्हापूर, सांगली भागात सुमारे ७० पेक्षा अधिक पथके तैनात करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना मदत करताना संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या नियंत्रणासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. कोल्हापूर, सांगली भागात सर्पदंशावरील लस, लेप्टोवरील गोळ्या आणि पाणी शुद्धीकरणासाठी १ कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप केले जात आहे.पूरग्रस्त भागातील नागरीकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्या कामात सहकार्य करतानाच तेथील नागरिकांना आवश्यक ती वैद्यकीय मदत देखील केली जात आहे. राज्यातील अन्य भागात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती आहे तेथील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधेचाही आरोग्यमंत्री दैनंदिन आढावा घेताना दिसत आहेत. राज्यभरात ३२५ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. राज्यातील अन्य भागापेक्षा कोल्हापूर, सांगली भागातील परिस्थिती बिकट आहे. या भागातील पाणी काहीसे कमी होण्यास सुरूवात झाली आहे. सर्पदंशावरील लसंचा मोठ्या प्रमाणात पुरवठा आरोग्य विभागामार्फत या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ७० पेक्षा अधिक वैद्यकीय पथके कार्यरत केली आहेत.पुरस्थितील नागरिकांना शासन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे अशा वेळी सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांची पाय खेचण्यापेक्षा पुरस्थितील नागरिकांना मदतीसाठी आर्थिक देणगी निधी कशी देता येईल व तेथील लोकांच्या समस्यांचे निवारण कसे करता येईल याकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे असेही शमशुद्दीन खान म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन परिपत्रकातील अपवादात्मक मजकूर वगळले असल्याचे जाहीर करून कशाप्रकारे मदत दिली जाईल त्याची माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे –
– परवा हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी मिळाली नव्हती
– सांगली ९ दिवसांमध्ये ७५८ टक्के पाऊस पडला आहे
– कोल्हापुरात ९ दिवसांत ४८० टक्के पाऊस
– ९ दिवसांमध्ये कोयना धरण ५० टक्के भरलं
– कोयना धरनातून मोठा विसर्ग
– २००५ च्या तुलनेत कोल्हापूर आणि सांगलीमध्ये तीन पट पाऊस पडला
– ३१ दिवसाचा पाऊस नऊ दिवसांत पडला
– विक्रमी पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती उद्भवली
– अनेक राज्यातून बचावपथकं कोल्हापूर-सांगलीमध्ये दाखल
– एनडीआरएफच्या टीमद्वारे युद्धपातळीवर मदत
– सांगलीत एकूण ९५ बोटीद्वारे बचावकार्य सुरू
– शिरोळ तालुक्यात आणखी लोक अडकले आहेत
– २७ हजार हेक्टर जमिनीवर पुराच्या पाण्याचा फटका
– सांगली आणि कोल्हापूरमधून जवळजवळ साडेतीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
– ४४८ किमी रस्ते पावसामुळे खराब
– ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत १२ मृत्युमुखी, ८ बेपत्ता, दोन जखमी.
– नेव्हीच्या माध्यमातून मदतकार्य करू २८ हजार ५२७ कुटुंब परामुळं विस्थापित करण्यात आली आहेत.
– लोकांना अन्नधान्य पोहचवण्यावर सरकारचे लक्ष
– मदतीसाठी घरात दोन दिवस पाणी असावे, ही अट शिथील करण्यात आली
– काही मदत कॅशद्वारे काही मदत बँकेद्वारे
– आतापर्यंत १५३ कोटींची मदत
– मृताच्या नातेवाईकाला पाच लाखांची मदत
– जनावर गमावलेल्या लोकांच्या मदतीतही वाढ
– प्रत्येक गावात डॉक्टर आणि दोन फार्मासिस्ट
– मृत जनावराची लवकरात लवकर विल्हेवाट लावली जाईल
– शेतीतला गाळ काढण्यासाठी प्रतिहेक्टर १३ हजाराची मदत
– खरवडून गेलेल्या जमिनीसाठी प्रतिहेक्टर ३८ हजाराची मदत
– सिद्धिविनायक, शिर्डीसारख्या संस्थानकाकडून मदत
– वीज- पाणी पुरवठा सुरळीत करण्यावर भर
– गाव दत्तक घेऊन सरकारसोबत काम करण्याची इच्छा असल्यास आम्हाला कळवावे
– कमीत कमी पुराव्याच्या आधारे मदत दिली जाणार
– केंद्र सरकारची संपूर्ण मदत
– अनेक राज्यात सध्या पूरस्थिती
– १०० डॉक्टरांची टीम पूरग्रस्त भागात कार्यरत
– या परिस्थितीचे राजकारण करू नये
– विरोधीपक्षाने या परिस्थितीचे राजकारण करू नये
– सर्वांनी एकत्रित मदत करण्याच प्रयत्न केला पाहिजे
– विरोधी पक्षाने राजकारण करू नये, आपल्याला राजकारण करायला दुसरीकडे पुष्कळ जागा आहे
– परिस्थिती बिकट आहे, या परिस्थिती कुणी राजकारण करू नये
– कर्नाटक सरकारने वेळोवेळी मदत केली
– आलमट्टी धरणाच्या विसर्गाबाबत पहिल्या दिवसापासून कर्नाटक सरकारशी संपर्कात आहोत. त्यांच्याही अडचणी आहेत, मात्र कर्नाटक सरकारने हळूहळू विसर्ग वाढवून 5 लाख 30 क्यूसेक केला आहे. दोन्ही राज्य पूर्णपणे एकमेकांना मदत करत आहेत असे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले असल्याने व शासन स्तरावरून मदत कार्य सुरु असल्याचे दिसून येत असल्याने पुरस्थितीतील नागरिकांना मदत करण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून आपल्या सर्वांची आहे.त्यामुळे चला मदतीचा हात देवूया पूर ग्रस्त लोकांना साथ असे शमशुद्दीन खान म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *