वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील क्लीन-अप मार्शल, प्लास्टिक व्यापारी व उत्पादन कंपन्यांकडून अवैध वसुली करत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. एवढेच नव्हे तर चिकन-मटन दुकानांच्या परवान्यांच्या नावाखालीसुद्धा मनपाच्या कर्मचाऱ्यांकडून अवैध वसुली केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या जिल्हा माध्यम प्रमुखांनी केला असून, त्यांनी आयुक्तांना पत्र देऊन चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.

विरार: वसई-विरार महानगरपालिकेचा घनकचरा विभाग प्लास्टिक बंदीचे मोठे दावे करत असला, तरी प्रत्यक्षात बाजारात प्लास्टिकच्या पिशव्या सर्रासपणे वापरात असल्याचे चित्र दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर केवळ दिखाऊ कारवाई करून वसुली सुरू असल्याचा आरोप आहे. अनेक कंपन्यांवर ना सील कारवाई झाली आहे, ना मशिन जप्त करण्यात आली आहेत. तरीसुद्धा या कंपन्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन सातत्याने सुरू असून, मोठ्या प्रमाणावर त्या बाजारात विकल्या जात असल्याचे समोर आले आहे ।स्थानिक स्तरावर स्वच्छता निरीक्षक आणि कनिष्ठ निरीक्षक काही किलो प्लास्टिक जप्त करण्याची दिखाऊ कारवाई करतात, परंतु मोठ्या गोडाऊनमध्ये साठवलेले टनच्या टन प्लास्टिक मात्र तसाच राहतो. या सर्वामुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होत असून, मनपा प्रशासन केवळ दिखावटी कारवाई करत असल्याची टीका होत आहे । घनकचरा विभागातील स्वच्छता निरीक्षक निलेश जाधव आणि प्रभारी सहाय्यक आयुक्त नीता कोरे यांच्यावर मुख्य जबाबदारी असल्याचे समजते. विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संरक्षणाखाली क्लीन-अप मार्शल गुटखा विक्रेत्यांकडून, गॅरेज धारकांकडून तसेच प्लास्टिक व्यापाऱ्यांकडून दर महिन्याला अवैध वसुली करत आहेत।याच मालिकेत चिकन-मटन दुकानदारांकडूनही परवान्यांच्या नावाखाली अवैध वसुली केली जात असल्याचे समोर आले आहे. ज्या परवान्यासाठी केवळ दोन हजार रुपये फी असल्याचे सांगितले जाते, त्यासाठी प्रत्यक्षात ११ हजार रुपये मागितले जात असल्याचे आरोप आहेत । प्रभाग समिती ‘ई’ अंतर्गत मच्छी बाजाराजवळील चिकन-मटन दुकानदारांनी सांगितले की, “सतीश” आणि “चव्हाण” नावाचे दोन व्यक्ती, जे स्वत:ला मनपाचे कर्मचारी म्हणवतात, त्यांनी परवाना अर्ज देताना ११ हजार रुपये मागितले. पैसे न दिल्यास कारवाई होईल, असेही त्यांनी धमकावले ।या प्रकरणाबाबत स्वच्छता निरीक्षक अविनाश गुंजाळकर आणि कनिष्ठ निरीक्षक स्वप्निल ढगे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की हे दोन्ही व्यक्ती प्रभाग समिती ‘ई’ च्या स्वच्छता विभागाशी संबंधित नाहीत, तसेच परवाना शुल्क केवळ दोन हजार रुपये असल्याचे स्पष्ट केले ।या तक्रारीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यावर ‘अधिकारी मीटिंगमध्ये व्यस्त आहेत’ असे सांगण्यात आले । या सर्व प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वसई-विरार शहराचे मीडिया प्रमुख कमर बेग यांनी आयुक्त सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्तांना भेटून सखोल चौकशी आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्याचे जाहीर केले आहे ।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *