ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे जीवनावश्यक वस्तू वाटून जपताहेत सामाजिक बांधिलकी

चिपळूण  : येथील बाजारपेठ प्रभागाचे ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन- अनलॉक कालावधीत गरजूंना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपत आहेत. ही सेवा अजूनही सुरूच असून मंगळवारी मुरादपुर कुंभारवाडी येथील गरजूंना नगरसेवक करामत मिठागरी व नगरसेविका सौ. संजीवनी शिगवण यांच्या पुढाकाराने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप या सर्वांना दिलासा दिला आहे.
कोरोनाच्या वातावरणात सर्वच हवालदिल झाले असताना शहरातील गरजू नागरिकांना मदतीचा हात म्हणून यापूर्वी नगरसेवक सुधीर शिंदे यांनी खेंड बावशेवाडी, महालक्ष्मी नगर नवीन वसाहत, खेंड विभाग, कांगणेवाडी, मुरादपूर, झोपडपट्टी, बाजारपेठ, रंगोबा साबळे रोड येथील शेकडो नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले आहे. अनलॉक कालावधीत जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली असली तरी अर्थव्यवहार तितकेशे पूर्वपदावर आलेले नाहीत. यामुळे अजूनही काही लोकांसमोर अनेक प्रश्न आ- वासून उभे आहेत. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक सुधीर शिंदे यांनी अनलॉकच्या कालावधीतही गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाची मोहीम सुरूच ठेवली आहे. यानुसार मंगळवारी मुरादपुर कुंभारवाडी येथील गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात दिला आहे. यावेळी अस्लम मिठागरी, बरकत पाते, मुखत्यार मिठागरी, सुनील नानिसकर, अमित टेरवकर, सुरेश शिरकर, अशोक शिरकर, मारुती चिपळूणकर, फैजान चौगुले, खलील हमदुले मौसिन पाते आदी उपस्थित होते.
या उपक्रमाबरोबरच गेली काही वर्षे मोफत भाजी वाटप ,ना नफा तत्वावर कांदा , बटाटा विक्री असे अनेक उपक्रम महर्षी कर्वे भाजी मंडईचे अध्यक्ष असलेले सुधीर शिंदे करतच असतात. मुरादपुर कुंभारवाडी येथील नागरिकांनी सुधीर शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *