

महापालिकेच्या नियुक्त ठेकेदार याच्या मार्फत सागर शेत पेट्रोल पंप येथे उघडीचे काम सुरू आहे. हे काम करदात्यांच्या पैशातून होत असल्याने त्या कमाबाबतची संपूर्ण माहिती समजून घेण्याचा अधिकार करदात्या नागरिकांना आहे.या बाबतची सुस्पष्ट माहिती जनतेस देणे बाबतचा फलक ठेकेदारांनी लावलेला नाहीत. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजना देखील ठेकेदाराने केलेल्या नाहीत.कामाचा योग्य दर्जा राखलेला नाही, महापालिकेच्या अभियंता यांची कामाच्या गुणवत्तेवर योग्य देखरेख नाही,या आणि यासारख्या अनेक शंका व त्रुटी व वस्तुस्थिती तसेच जनतेस होत असलेल्या त्रासा मुळे जनतेच्या भावना तीव्र होत्या.
या बाबत खुलासे वजा माहिती मिळावी म्हणून सोमवार दिनांक १५जून २०२० रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या अभियंत्यांनी स्वतः जागेवर उपस्थित राहून करदात्या जनते च्या शंकांचे निरसन करावे असे लेखी पत्र मुख्य कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले होते. त्यानुसार श्री. साटम व श्री. संखे हे अभियंते स्वतः जागेवर उपस्थित होते. तसेच करदाते नागरिक तोंडाला मास्क लावून व सामाजिक अंतर ठेऊन प्रत्यक्ष जागेवर उपस्थित होते.
संबंधित अभियंता यांनी कामाची पाहणी केल्यावर त्याचा लेखी अहवाल तयार करणे व त्यात कामात असलेले दोष व त्रुटी याची नोंद घेणे व त्यानुसार ठेकेदारास लेखी कळविणे व त्याची पूर्तता होणे आवशक होते. हि कार्यपद्धती पाळली गेली नसल्याचे त्यांनी मान्य केले.रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यात चार रस्त्याचा नाका असलेल्या ठिकाणी एवढे मोठे काम सुरू असताना रात्रीच्या वेळी उजेड असण्यासाठी फोकस लावलेले नाहीत.कामाचे रस्त्यावर आगाऊ सूचना देणारे फलक ठीक ठिकाणी लावलेले नाहीत.कामाचे स्वरुप विशद करणारा फलक ही लावण्यात आलेला नाही.कामाचा दर्जा व कामाचा रेखीव पणा दिसून येत नाही.अश्या अनेक त्रुटींवर चर्चा झाली.नागरिकांनी कामाचा खर्च व कामाची गुणवत्ता यावर अनेक प्रश्न विचारले.अनेक प्रश्नांची उत्तरे अभियंता यांच्या कडे नव्हती.असलेल्या चुका व त्रुटींची दखल घेतो व उचित कार्यवाही करतो असे आश्वासन त्यांनी दिले.या नंतर आमच्या अभियंता सह महापालिका कार्यालयात बेठक होऊन त्यात कामाचे स्वरूप व खर्च या बाबत लेखा परीक्षण होईल ,तसे पत्र आम्ही महापालिकेस देत आहोत व तो पर्यंत ठेकेदारास देय रक्कम देणे बाबत आपण योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली.
मी वसईकर अभियान,शिव सेना ,प्रहार जनशक्ती व अनेक संघटना यांच्या वतीने हा जन लेखापरीक्षण उपक्रमाचे आयोजन केलं होत.उपक्रमात श्री.हितेश जाधव, डॉमनिका डाबरे,प्रमोद मुकुंद दळवी,लिनस डीकुन्हा ,मिलिंद खानोलकर, ओलींडा डीकुन्हा, अनिल चव्हाण,शिव कुमार पांडे,दिनेश सामंत, किरण शिंदे,नयना वर्तक,निलेश वर्तक सुनील डीसलवा यांच्यासह सह सर्व संघटनांचे असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.यापुढेही प्रत्येक ठेक्याच्या कामाचे स्थानिक करदात्यांच्या उपस्थितीत जन लेखा परीक्षण करण्यात येईल असे संघटनांच्या वतीने जाहीर करण्यात आले.
आपला,