
३१ ऑटोबर , २०२१
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन चौदा दिवस होऊन गेले असतील त्यांना लोकल रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आली आहे . महाराष्ट्र शासनाने दि. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी जारी केलेल्या निर्देशात मध्य व पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना वरील निकष पूर्ण करणाऱ्या प्रवाशांना सर्वप्रकारची रेल्वे प्रवासाची तिकीटे – दैनंदिन , मासिक अथवा काळानुसार – देण्यात यावीत असे सांगण्यात आले आहे.
ह्या पूर्वी वरील निकष पूर्ण करणाऱ्यांना फक्त मासिक पास देण्याची मुभा होती तसेच आपत्कालीन सेवा ह्यांना दैनंदिन प्रवासाची तिकिटे देण्यात येत होती. पण काही दिवसांपूर्वी कोणालाही दैनंदिन रेल्वे प्रवासाचे तिकीट देणे रेल्वेने बंद केले होते. त्या मुळे लोकांच्या हालत भर पडली. ह्या विषयावर उमेळा ( वसई ) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप अनंत राऊत ह्यांनी दिनांक २९ ऑक्टोबर , २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे तसेच राज्यपाल , केंद्रीय रेल्वे मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे मुख्य सचिव ह्यांना ई-मेल पाठवली होती. त्यात त्यांनी शासनाने कोविड काळातील निर्बंध शिथिल केल्या बद्दल आभार मानले होते . दैनंदिन दिवसाची रेल्वे प्रवासाची तिकिटे नसल्यामुळे मुंबई उपनगर आणि पुढच्या लोकल गाड्यांच्या प्रवासातील क्षेत्रातील लोकांना उद्योगधंदा, नोकरी , रुग्णालये व इतर काही कारणास्तव मुंबईला येणे क्रमप्राप्त असल्यामुळे सामान्यांचे हाल होत होते. तसेच पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे दैनंदिन रेल्वे प्रवासाची मुभा मिळणे आवश्यक होते. म्हणून रेल्वे प्रवासावरील निर्बंध उठवून सर्वसामान्यासाठी पूर्णपणे खुला करावा अशी विनंती केली होती.
राज्य शासनाने त्यांच्या विनंतीची त्वरित दखल घेऊन लसीचे दोन डोस घेऊन चौदा दिवस पूर्ण झालेल्यांना सर्व प्रकारचा प्रवासाची मुभा देण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनास दिले आणि त्यानुसार आजपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे .
प्रवाशांनी महाराष्ट्र शासनाच्या युनिव्हर्सल पाससाठी असलेल्या संकेतस्थळावर जाऊन तो पास तयार करून व तो छापून रेल्वे तिकीट खिडक्यांवर दाखवा म्हणजे आपल्याला तिकीट मिळणे सोपे जाईल असे श्री दिलीप राऊत ह्यांनी सुचविले आहे . स्थानिक संस्थांनी जारी केलेले प्रमाण पत्र ही वैध आहे.
संकेत स्थळ ; https://epassmsdma.mahait.org/login.htm