

दि. १९ मे २०१९. जव्हार शहरात कित्येक दिवसांपासून गुटखा विक्री लपूनछपून चालू आहे.परंतु काही गुटखा व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या तरी हि गुटखा विक्रीची मालिका शहरात काही भागात सर्रास चालू आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्रीवर बंदी लादली असली तरी गुजरात राज्यातुन मोठ्या प्रमाणात गुटखा काही व्यापारी विक्रीसाठी शहरात घेऊन येतात .मग त्याची विक्री लहान दुकानांमधून केली जाते.यावर निर्बंध घालण्यासाठी जव्हार पोलिसांनी सापळा रचून जांभुळविहीर पश्चिम भागातुन रउफ घाची या आरोपी मजकुर याच्या स्वतःच्या मालकीच्या राहत्या घरातून गुटख्याच्या मुद्देमालाचा साठवणूक साठा मोठ्या प्रमाणात जप्त केला असुन त्याला अटक केली आहे. गुटख्याची साठवणूक केलेल्या आरोपी कडून ४८,००० रुपयांच्या कि.सु.चे केसरयुक्त पान मसाल्याच्या ८ गोणी, १,१८,८०० रुपये किंमतीचे केसरयुक्त पान मसाल्याच्या ३० गोणी, ५६,१०० रुपयांचे कि.सु.चे केसरयुक्त पान मसाल्याच्या ६ गोणी, ११,८०० रुपये किंमतीचे वि- १ तंबाखूचे एकूण २७ गोणी, १२,००० किंमतीचे वि- १ तंबाखूचे एकूण ८ गोणी. असा एकूण – २,४६,७८०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जव्हार पोलिसांनी आरोपी कडून जप्त केला आहे. आरोपी विरुध्द जव्हार पोलीस स्टेशनमध्ये,गु.र.नं ५९/२०१९ भारविसक ३२८, १८८, २७२, २७३, सह अन्न सुरक्षा व मा.न.दे. कायदा २००६ नुसार नियमाने २०११ चे कलम २६(२) सह कलम ३०(२) अ, ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर गुन्ह्यातील आरोपीस रउफ घाची शुक्रवारी १७ मे २०१९ रोजी ११वाजून ५ मिनिटांनी अटक झाली आहे. ह्या कारवाईची कामगिरी नविन पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक जी.जे.वळवी यांपोलिस उपनिरीक्षक शरद सुरळकर,मपो हवालदार आळेपो नाईक मनोज सानप, पोशि साचिन आव्हाड, पोशि शरद उगलमूगले,पो शि मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून जव्हार पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने केली.त्यांच्या यशाबदल जव्हारच्या नागरिकांकडून व साप्ताहिक पालघर नागरिक त्यांचे कौतुक करत आहे.
🏼