दि.०३ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक दिव्यांग दिन’ म्हणून साजरा केला जातो. वसई विरार शहर महानगरपालिका व दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विरार (प.) यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दि.०३ डिसेंबर, २०२२ रोजी जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रमाचे आयोजन वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय सभागृह, चौथा मजला, विरार (पूर्व) येथे सकाळी ११.०० वाजता करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग नागरिकांना महानगरपालिकेकडून पुरविण्यात आलेल्या निधीतून कृत्रिम अवयव व सहाय्यक साधने वितरीत करण्यात आली. लाभार्थ्यांना १० ट्रायसिकल, ३० श्रवणयंत्र, १५ व्हीलचेअर, १० कुबड्या तसेच ६ ते १५ वर्षे वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांना ९७ शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमास मा.खासदार श्री.राजेंद्र गावीत, मा.आयुक्त तथा प्रशासक श्री.अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त श्री.अजिंक्य बगाडे, माजी स्थायी समिती सभापती श्री.प्रशांत राऊत, माजी सभापती श्री.सखाराम महाडीक, माजी महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम.माया चौधरी, माजी नगरसेवक व नगरसेविका, प्र.शहर अभियंता श्री.राजेंद्र लाड, उप-आयुक्त श्री.किशोर गवस, उप-आयुक्त डॉ.विजकुमार द्वासे, पश्चिम रेल्वे चे प्रबंधक श्री.म्हात्रे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.शंतनू उदगीर, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे डॉ.संतोष गोरड, श्री.ललित पाटील, श्री.डीब्रेटो सर, स्वामी परिज्ञानाश्रम केंद्र, बोळींज चे मुख्याध्यापक श्री.जयेश संखे, श्री.चिंचोळकर सर, तसेच अपंग जनशक्ती संस्था अध्यक्ष देवीदास केंगार व सहकारी, अपंग कल्याणकारी संस्था अर्नाळा चे अध्यक्ष श्री.शमीम खान व सदस्य, पत्रकार बंधू, दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक, शिक्षक वर्ग, मान्यवर नागरिक व वसई विरार शहर महानगरपालिकेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.श्वेता पाटील ह्यांनी केले.
तसेच माहे डिसेंबर २०२२ या महिन्यात आठवड्याच्या प्रत्येक सोमवार व बुधवार रोजी दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विरार (प.) येथे दिव्यांग नागरिकांसाठी विशेष मोफत वैद्यकीय तपासणी व थेरेपी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असून, सदर शिबिरात दिव्यांग नागरिकांची तपासणी व नोंदणी करण्यात येणार आहे. तरी, या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांनी घ्यावा व तपासणी तसेच नोंदणी करून घ्यावी याबाबत महानगरपालिकेचे मा.आयुक्त तथा प्रशासक यांनी या कार्यक्रमात आवाहन केले.
दिव्यांग कल्याण विभाग
वसई विरार शहर महानगरपालिका